शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे हल्ले सुरूच!

By admin | Updated: January 15, 2016 04:04 IST

जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढल्याने दहशत पसरली आहे. बेल्हा परिसरात मंगळवारी हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच साकोरीत गुरूवारी

बेल्हा : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढल्याने दहशत पसरली आहे. बेल्हा परिसरात मंगळवारी हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच साकोरीत गुरूवारी एका बच्छड्याने एकावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाल्या आहेत. सुरेश सखाराम गाडगे असे त्यांचे नाव आहे. खुटाळमळ्याच्या पुलाजवळ साकोरीच्या हद्दीत गाडगे यांची शेती आहे. ते उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असतानाच उसामधे दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या बछड्याने त्यांच्या हातावरच उडी घेतली, त्या वेळी ते खाली पडले. बिबट्याने त्यांच्या हाताला ओरखडले. त्यामुळे जखमा झाल्या. ते अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतच आले. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना माहिती दिली. त्यांना ताबडतोब निमगावसावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले आहे.रानमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाली होती, ते ठिकाण १ ते २ किलोमीटरवर आहे. या ठिकाणी चारंगबाबांच्या ओढ्याजवळ भाऊसाहेब थोरात यांना एक बिबट्या व दोन बछडे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या पूर्व भागात सर्वच गावांमध्ये बिबट्याचीच भीती असून जीव धोक्यात घालून ग्रामस्थ ये-जा करीत आहेत.वडगाव कांदळीत ३ शेळ्या ठारआळेफाटा : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील निलख मळा शिवारातील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मण दादाभाऊ फुलसुंदर यांच्या घरासमोर गोठा आहे. गोठ्याच्या भिंतीवरून बिबट्याने आत प्रवेश करून आतील तीन शेळ्यांचा फडशा पाडला. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्याने भक्ष जागीच सोडून बाजूच्या शेतात धूम ठोकली. या वेळी फुलसुंदर यांनाही जाग आली व त्यांना शेळ्या ठार झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक मनीषा बनसोडे व नाथा भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.पिंंजरा लावापशुधनावर हल्ले वाढत आहेत. वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे तीन तर पिंपरी पेंढार परिसरात एक शेळी फस्त केल्याने या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. पिंपरी पेंढारला शेळी ठारआळेफाटा : पिंपरी पेंढार परिसरात घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. गाजरपट शिवारातील सुरेश दामोधर डेरे यांच्या राहत्या घराशेजारील असणाऱ्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळीवर काल बुधवारी (दि. १३) रात्री आठच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यानंतर बिबट्याने ही शेळी बाजूच्या शेतात नेऊन ठार केली. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पाऊलखुणांवरून त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दोनच दिवसांपूर्वी येथील जांभुळपट शिवारातील शेतजमिनीतील विहिरीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला होता.