शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरात पुणे जिल्ह्यात ६७ जणांवर बिबट्याचे हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST

पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० जणांवर हल्ले झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात अनेक जण गंभीर ...

पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० जणांवर हल्ले झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात अनेक जण गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात ४३ तर नोव्हेंबर महिन्यात ६७ घटना घडल्या. या काळात पशुधनावर सर्वाधिक हल्ले करत त्यांना बिबट्याने ठार मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे, तर काहींना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती जुन्नर वनविभागाचे प्रमुख जयरामे गौडा यांनी दिली.

जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हे बिबट्याप्रवण क्षेत्र आहेत. या परिसरात असलेली ऊस शेती आणि अभयारण्य बिबट्याच्या वाढीस पोषक ठरले आहेत. शासनाने हा परिसर बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्या आणि मानव संघर्ष या परिसरात पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १०० जणांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या नोंदी आहेत. सुदैवाने या हल्ल्यात जीवित हानी झालेली नाही. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात रोज शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याचे बळी ठरत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. तर बिबट्यांचा माग राखण्यासाठी त्यांच्या मानेवर सेंन्सरही लावण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे.