शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हडपसर सहायुक्तालयात डुकरे सोडून शिवसेनेचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 20:50 IST

पुणे मनपा आयुक्तालयात डुकरे सोडून पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, भुयारी मार्गाच्या कामासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. 

ठळक मुद्देभुयारी मार्गाच्या कामासाठी आंदोलन करणार हंडेवाडी रोड चे अतिक्रमण तसेच भाजी मंडईचे स्थलांतर ६ जून पर्यंत करून देणार

हडपसर : वारंवार आंदोलने करून निवेदने देऊनही डुकरे, पाणीपुरवठा, वाहतूक समस्या, अतिक्रमणे हे प्रश्न सुटत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर सहायुक्तालयात डुकरे सोडून उपोषण केले. प्रभाग क्रमांक २६ मधील सातवनगर, हांडेवाडी रोड या भागात मोकाट डुकरे आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पथारी व्यावसायिक, अनधिकृत भाजी मंडई यामुळे रोज हांडेवाडी रोडवर वाहतूक कोंडी होते आहे. सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे काम मंजूर होऊनही अद्याप सुरू झालेले नाही. हे सर्व प्रश्न सुटण्याकरिता वारंवार पत्रव्यवहार, निवेदने देऊनही प्रशासन काही हालचाल करत नसल्याने आज सहायुक्तलयात डुकरे सोडून उपोषण करण्याची वेळ आल्याचे नान भानगिरे यांनी सांगितले.यावेळी सहाययक आयुक्त उपस्थित नसल्याने इतर शिवसैनिकानी आंदोलन व उपोषण मागे घेण्यास नकार दिला.त्यामुळे पुणे महापालिकेचे अतिक्रम अधिकारी माधव जगताप, आरोग्य अधिकारी हेमंत देवधर, विजय पवार, सुभाष पवार आदींनी आंदोलन स्थळी भेट देऊन सर्व प्रश्न सोडवण्याची लेखी ग्वाही देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.याप्रसंगी आशिष आल्हाट, विकास भुजबळ, सचिन तरवडे, वीरभद्र गाभने, शिवा शेवाळे, म्हेत्रे काका, विनायक पाटील, अभिजित बाबर, संतोष जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भानगिरे म्हणाले, दिवसाआड अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांचे हाल होत आहेत. डुकरामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले. पण पालिका प्रशासन काहीच करायला तयार नाही. केवळ आश्वासने देण्याचे काम अधिकारी वर्ग करत आहेत. इतर प्रभागानमध्ये नियमित रोज पाणी येते, पण प्रभाग क्र.२६ मध्ये मात्र दिवसाआड पाणी येत आहे. सर्वात जास्त कर या प्राभागातून पालिका मिळवतो. पण सुविधा मात्र देत नाही, असा आरोप त्यांनी करतानाच आता पुणे मनपा आयुक्तालयात डुकरे सोडून पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, भुयारी मार्गाच्या कामासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच हंडेवाडी रोड चे अतिक्रमण तसेच भाजी मंडईचे स्थलांतर ६ जून पर्यंत करून देणार  आहे. तसेच हंडेवाडी रोड ‘नो हॉकर्स झोन’ करून देणार अशी ग्वाही अतिक्रमण विभाग माधव जगताप (उपयुक्त अतिक्रमण), दिलीप पोवरा (क्षेत्रिय अधिकारी) डी. एस. ढोकले (अतिक्रमण झोन आॅफिसर) यांनी दिली.डुक्कर मुक्त प्रभाग १ ते २ महिन्यांत पर्याय जागेमध्ये स्थलांतर करणार अशी ग्वाही आरोग्य विभाग वैशाली साबने, डॉ. मोरे, डॉ. वाघ, डॉ. माने  यांनी सांगितले. 

टॅग्स :HadapsarहडपसरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना