शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
5
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
6
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
7
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
8
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
9
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
10
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
11
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
12
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
13
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
14
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
15
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
16
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
17
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
18
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
19
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
20
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण

पिके जगवण्यासाठी आवर्तन सोडा

By admin | Updated: May 9, 2017 03:31 IST

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खडकी परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खडकी परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. खडकवासला कॅनॉलअंतर्गत वितरिका क्रमांक ३२, ३४, ३५ मध्ये पाणी सोडण्याची मागणी पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले आणि सरपंच मंगेश शितोळे यांनी केली आहे.पूर्व भागातील खडकी, रावणगाव, नंदादेवी आणि स्वामी चिंचोली हा परिसर खडकवासला कॅनॉलअंतर्गत वितरिका क्रमांक ३२, ३४, ३५ च्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु या परिसरातील खडकवासला कॅनॉलचे उन्हाळी आवर्तन लांबल्याने या भागाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावांमध्ये पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कूपनलिका आदी जलस्रोत कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी उभी पिके जळून चालली आहेत. या परिसरातील ऊस, भुईमूग, फळबागा, जनावरांसाठी हिरवा चारा, तरकारी आदी पिके जळून गेली असून बळीराजाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकरी खडकवासला कॅनॉलअंतर्गत वितरिका क्रमांक ३२, ३४, ३५ वर येणाऱ्या ओढे व बंधारे यामध्ये तत्काळ पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.