शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात गळती

By admin | Updated: January 10, 2017 03:36 IST

केंद्र शासनाच्या माध्यान्ह भोजन योजना, म्हणजेच शालेय पोषण आहार योजनेत तीन वर्षांपासून राज्यातील विद्यार्थ्यांची गळती सुरू असल्याचे चित्र आहे.

राजानंद मोरे / पुणेकेंद्र शासनाच्या माध्यान्ह भोजन योजना, म्हणजेच शालेय पोषण आहार योजनेत तीन वर्षांपासून राज्यातील विद्यार्थ्यांची गळती सुरू असल्याचे चित्र आहे. एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत आहार मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सध्या जवळपास ८० टक्के आहे. हेच प्रमाण शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये सुमारे ८८ टक्के एवढे होते. या योजनाचा लाभ घेण्यात राज्यात मुंबई सर्वाधिक मागास असून, निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहार अद्यापही मिळत नाही.सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा शाळांकडे ओढा वाढावा, या उद्देशाने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित संस्थांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषक आहार दिला जातो. दर वर्षी त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. राज्यात या वर्षी ८६ हजार ५०७ शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७मध्ये प्राथमिकमध्ये सुमारे ६९ लाख २६ हजार, तर उच्च प्राथमिकमध्ये सुमारे ४६ लाख २७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांपैकी दुसऱ्या सत्रात अनुक्रमे ५५ लाख ४० हजार आणि ३६ लाख ८० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचला आहे. हे प्रमाण सरासरी ८० टक्के एवढे आहे. शैक्षणिक वर्ष २०१-१४मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८८ टक्के विद्यार्थ्यांना योजनेचा फायदा मिळाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी हे प्रमाण कमी होत गेल्याचे एका अहवालानुसार स्पष्टपणे दिसून आले आहे. २०१४-१५मध्ये प्राथमिकच्या ८४ टक्के, उच्च प्राथमिकच्या ८१ टक्के विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला. त्यापुढील वर्षातही आहार मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात २ टक्क्यांची घट दिसून आली आहे. ही गळती चालू शैक्षणिक वर्षातही कायम आहे. मात्र, हे प्रमाण मागील तीन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. यामध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक असल्याचे चित्र असून, शाळांकडून योजनेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मुंबईत प्राथमिक व उच्च प्राथमिकमध्ये अनुक्रमे ६८ व ६१ टक्के विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाही. ग्रामीण भागात मात्र या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.