शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या कडाडल्या

By admin | Updated: June 3, 2017 02:35 IST

शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आठवडा बाजार ओस पडले आहेत. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले. भाजी, फळे आणि दूध विक्रेत्यांनी दुप्पट, तिप्पट दर आकारून ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवली.पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी पुलाखालील भाजी मंडईत नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी मात्र भाजीची आवक न झाल्याने मंडईत शुकशुकाट होता. अनेक भाजी विक्रेत्यांच्या टोकऱ्या रिकाम्या दिसून आल्या. शेतकरी संपाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवला. दहा ते पंधरा रुपयांना मिळणाऱ्या मेथीच्या गड्डीसाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागले. ४० रुपये किलोने मिळणारी वांगी १०० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. कोथिंबिरीच्या गड्डीलाही २५ ते ३० रुपये द्यावे लागले. ग्राहकांना दूध मिळणे मुश्कील झाले. दूधही चढ्या भावाने विक्री होत होते. फळांची आवकसुद्धा कमी प्रमाणात झाली असल्याने वाढीव दराने फळे खरेदी करणे ग्राहकांना भाग पडले. हॉटेल व्यावसायालाही फटका उद्योगनगरी लगतच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा माल येत असतो. मात्र, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा माल कमी झाला आहे. अजमेरा कॉलनीतील पिल्ले सांस्कृतिक भवनाजवळ दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या वेळी मात्र भाजी विक्रेते कोणीही फिरकले नाही. आठवडे बाजाराच्या ठिकाणी अक्षरश: मुले क्रिकेट खेळत होती. ग्राहक नेहमीप्रमाणे आठवडा बाजाराच्या ठिकाणी येत होते. मात्र, संपामुळे विक्रेत आले नाहीत, हे समजल्यानंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत होते. हॉटेलांमध्येही कांदा, काकडी, मिरची देताना आखडता हात घेतला जात होता.आज सायंकाळी मंडईत शिल्लक भाजीपाल्याचे दर वाढले आहेत़ जास्त भाव देऊन शिळ्या भाज्या विकत घेण्यापेक्षा कडधान्य शिजवून भाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुढेही आंदोलन सुरू राहिले तर काय भाजी करावी हा प्रश्न सतावत आहे, असे रुपीनगर येथील गृहिणी कविता पडवळ यांनी सांगितले.चिखली मंडईतून पालेभाज्या गायबचिखली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम भाजी मंडईत दिसून येत आहेत. कालपासून शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये शेतीमाल विक्री करणे बंद केले आहे. त्यामुळे आज चिखली परिसरात एकाही विक्रेत्याकडे मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांसारख्या लोकांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या पालेभाज्या विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शहरातील काही विक्रेते पाठिंबा देत असून तेही भाजी खरेदी करण्यासाठी मार्केट अथवा प्रत्येक्ष शेतकऱ्याकडे गेलेले नाहीत, विक्रेते उपलब्ध असलेल्या कालच्या आणि परवाच्या शिल्लक मालाची विक्री करत आहेत. त्यातच शेतमालाची आवाक घटल्याने मालाचे भाव वाढवले आहेत. २० रुपये किलो असलेले टोमॅटो ४० रुपये, १० रु. पावशेर असलेली गवार १५ रु. झाली असून १५ रुपये प्रतिकिलो विकले जाणारे बटाटे २० रु़ भावाने विकले जात आहेत.