पुणे : राज्य शासनातर्फे आयोजित शैक्षणिक वर्ष २०१७-१९ मध्ये १९ वयोगटात घेतलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी केल्याने प्रथम क्रमांक मिळाला. पालिका क्षेत्रामध्ये १९ वर्षाखालील वयोगटात राज्य शासनातर्फे विविध क्रीडा स्पर्धा आयोजिल्या होत्या.
यात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत एकूण २१ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये ३ सुवर्ण, ५ रोप्य, ४ कास्य पदके पटकावली आहेत. तसेच या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धेत महाविद्यालयाने एकूण ३०२ पदके पटकावली आहेत, ही माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव यांनी दिली.
--------------
पहिला शरद-प्रतिभा पुरस्कार जाहीर
पुणे : मी कास्ट फ्री मुव्हमेंट संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शरद-प्रतिभा पुरस्कारबडॉ. एन.डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांना जाहीर झाला आहे. गोरगरिबांच्या कल्याणसाठी, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि जातीअंतासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या या जोडप्यांना वंदन करण्यासाठी शरद-प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष डॉ. प्रशांत गेडाम यांनी दिली.
--------