शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीही फिस्कटली

By admin | Updated: February 2, 2017 03:56 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचीही चर्चा फिस्कटली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचीही चर्चा फिस्कटली आहे. सन्मानकारक जागा न मिळाल्याने आघाडीची चर्चा थांबली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गणेशोत्सवाच्या आरतीपासून याबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानाही आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ होते. सर्वांना आघाडी कधी होणार? किंवा काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, जागांच्या संख्येवरून आघाडीची चर्चा थांबवली आहे. सुरूवातीला राष्ट्रवादीने विद्यमान नगरसेवक, त्यांच्याकडे आलेले नगरसेवक असा फॉर्मुला मांडला होता. मात्र, त्यास काँग्रेसचा विरोध होता. निवडणुकीसाठी १२८ पैकी पन्नास टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी सुरुवातीला झाली. त्यानंतर पन्नास जागा, चाळीस जागा आणि तीस जागा अशीही मागणी केली. प्रभागांनुसारही चर्चा झाली. त्यामुळे याबाबत तोडगा निघेल, असे वाटत असतानाच आघाडीची चर्चा थांबली. (प्रतिनिधी)काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. आम्ही सुरुवातीला ६४, त्यानंतर पन्नास, त्यानंतर चाळीस आणि शेवटी तीस जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाला वीस जागा देणे हे अपमानास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भूतकाळात रमलेली आहे. तिला वर्तमानाचे भान नाही. मतदारांना ग्राह्य धरले जात आहे. याचे उत्तर भविष्यात निश्चित मिळेल.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेसमहापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे गरजेचे होते. त्यानुसार चर्चाही झाली. प्रभागांनुसारही चर्चा केली. चर्चेत आम्ही विद्यमान नगरसेवक आणि आमच्याकडे आलेले नगरसेवक एवढ्या जागा मागून वीस जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे चर्चा थांबली आहे. सन्मानपूर्वक लढत होईल. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस