शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द करण्याच्या घोषणेमुळे उत्पन्न घटले

By admin | Updated: December 20, 2014 23:42 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजपा-सेना सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटी) पुढील आर्थिक वर्षापासून रद्द करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजपा-सेना सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटी) पुढील आर्थिक वर्षापासून रद्द करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आधीच एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही वाढीस लागली असून, नोव्हेंबर महिन्यात महापालिकेस अवघा ९२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी याच महिन्यार्त ११३ कोटी ८० लाख रुपयांचा एलबीटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता. विशेष म्हणजे मागील महिन्यापर्यंत पालिकेस किमान १०० कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र, अवघ्या काही दिवसांपूर्वी १ मार्च २०१४ पासूनच एलबीटी रद्द करण्याची घोषणा झाल्याने हे उत्पन्न ८ कोटींनी घटले आहे. त्यामुळे या घटत असलेल्या उत्पन्नाचा ताण पालिकेच्या अंदाजपत्रकावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या आर्थिक वर्षातील १४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणार कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या दहा महिन्यांत तो रद्द करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्याबाबत अद्याप संदिग्धता असली, तरी चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत पालिकेला दर महिन्यात शंभर कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे मुद्रांक शुल्कावरील अधिभारात झालेली घट, तसेच रहदारी शुल्क (एस्कॉर्ट) रद्द झाल्यानेही निर्माण झालेली तूट यांमुळे एलबीटीच्या उत्पन्नात घसरण होत असताना, नोव्हेंबरच्या निव्वळ एलबीटीच्या महसुलातही मोठी घट झाली आहे. राज्य सरकारने पुढील वर्षी १ एप्रिलपासून एलबीटी रद्द केला जाईल, अशी घोषणा केली आहे. परिणामी, व्यावसायिकांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे.पालिकेची नोटीस केराच्या टोपलीतएलबीटी न भरणाऱ्या तसेच कमी भरणाऱ्या व्यावसायिकांना राज्य शासनाची मान्यता घेऊन महापालिकेने सुनावणीसाठी नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक दिवशी पालिकेकडून २५ ते ३० व्यावसायिकांना कागदपत्रे घेऊन सुनावणीसाठी बोलावले जात आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून २५ ते ३० नोटिसा बजाविल्यानंतर अवघे दोन ते तीन व्यापारीच सुनावणीस उपस्थित राहत आहेत.