शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावकारकीचा झाला सुळसुळाट

By admin | Updated: November 6, 2016 04:20 IST

कमी कष्टात झटपट पैसे कमविण्यासाठी आता दहा ते चाळीस टक्के व्याजदराने पैसे कर्जरूपाने दिले जात आहेत. सावकारकीच्या माध्यमातून दहशत माजविण्याचा नवीन धंदा

सोमेश्वरनगर : कमी कष्टात झटपट पैसे कमविण्यासाठी आता दहा ते चाळीस टक्के व्याजदराने पैसे कर्जरूपाने दिले जात आहेत. सावकारकीच्या माध्यमातून दहशत माजविण्याचा नवीन धंदा सोमेश्वरनगर परिसरामध्ये सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात सावकारकीचा सुळसुळाट झाला आहे. नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीवरून हा विषय ऐरणीवर आला आहे. दहा हजारांच्या कर्जापोटी महिन्याला व्याज दोन हजार आकारले जात आहे. आवाढव्य व्याजआकारणी करुन सोमेश्वरनगर परिसरामध्ये जवळपास दोन कोटी रुपये अवैध वाटप केल्याचा आकडा सूत्रांकडून समजत आहे. कर्ज दहा हजाराचे व्याज वर्षाला नव्हे, महिन्याला १० ते ४० टक्के व्याजाच्या मोबदल्यात आतापर्यंत १ लाख दिले. तरीसुद्धा कर्ज अजून बाकीच असल्याचे वास्तव आहे. अशा जाळ्यात नागरिक अडकत आहेत. लाखो रुपयांचे भांडवल, सोबत दहशत मोठी असते. एखाद्याने कर्ज परत केलेच नाही तर या सावकाराच्या टगांची मजल कोणत्याही थराला जाऊ शकते. हे सावकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या नेत्यांच्या व गुंडप्रवृत्तीच्या लोकांचे फोटो टाकून समाजामध्ये दहशत पसरवितात. तक्रारच दाखल होत नसल्याने पोलीस यंत्रणाही हतबल झाली आहे. सर्व यंत्रणांचा काणाडोळा...सोमेश्वर कारखान्यांवरील सोमेश्वर कारखान्याच्या मालकीच्या दुकानातून सोमेश्वरनगर परिसरामधील सावकारी धंदा सुरू आहे. हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र, याकडेही सर्वच यंत्रणांचा काणाडोळा होत आहे.कधी मारहाण, कधी खोट्या तक्रारीव्याजाने दिलेल्या पैशांचे व्याज व मुद्दल वेळेत न दिल्यास याची गुंडांमार्फत वसुली केली जात असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहेत. वेळप्रसंगी याचे रूपांतर हाणामारी तर कधी विनयभंगाच्या बोगस तक्रारी दाखल करण्यापर्यंत जात आहे. तथ्य आढळल्यास कारवाई : पाटीलसहायक निबंधक यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.