शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वकील संघटनांना उद्घाटनांचा अधिकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:16 IST

कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून रंगलेल्या नाट्यात वकिलांच्या दोन संघटनांमध्ये जुंपलेली आहे; मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा

पुणे : कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून रंगलेल्या नाट्यात वकिलांच्या दोन संघटनांमध्ये जुंपलेली आहे; मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार या संघटनांना नसल्याचे न्यायालय प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले. उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या अधिकारातील ही बाब असून ज्यांचा हा हक्क आहे, त्यांनी हा प्रकार गंभीरपणे घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा विषय चिघळू लागला आहे.उद्घाटनच्या कार्यक्रमाच्या दिवशी व्यासपीठावर कोणत्या संघटनेच्या अध्यक्षाला स्थान असावे, कोणाला या कार्यक्रमातून दूर ठेवले जात आहे, कोणती संघटना प्रमुख, यावरून वकीलवर्गात चर्वितचर्वण सुरू आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन १२ आॅगस्ट रोजी होणार आहे; मात्र त्यापूर्वीच वकिलांमध्ये शब्दाशब्दी सुरू आहे.न्यायव्यवस्थेमध्ये वकीलही महत्त्वाचा कणा असल्यामुळे त्यांना बाजूला सारून कार्यक्रम घेता येणार नाही, असे असले तरी आता उद्घाटन कार्यक्रम घेण्याचा हक्क नेमका कोणाचा, हा प्रश्न समोर आला आहे. याविषयीचे वृत्त उच्च न्यायालयापर्यंत गेल्याचे सांगण्यात येते.यासंदर्भात, शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील प्रशासकीय सूत्रांकडे विचारणा केली असता, हा कार्यक्रम घेण्याचा अधिकार जिल्हाप्रमुख न्यायाधीश, कुटुंब न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारातील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे शिष्टमंडळ शनिवारी नवीन इमारतीची पाहणी करणार आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी व्यासपीठावर कोणाला बसण्याची संधी मिळणार, कार्यक्रमाचे श्रेय कोण घेणार, हे आता शनिवारनंतरच स्पष्ट होणार आहे.