शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नीराची लचकेतोड सुरूच

By admin | Updated: January 4, 2017 05:19 IST

इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी

बारामती / निरवांगी : इंदापूरच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूमाफियांकडून दररोज लचकेतोड होत आहे. पात्रामधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशामुळे नीरा नदी आता अस्तित्वासाठी झगडू लागल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता आहे. त्यामुळे येथील वाळूमाफिया कोणत्याही यंत्रणेस भीक घालीत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथे येणार आहेत. येथील नदीपात्राची परिस्थितीही फार वेगळी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथील प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यातून उद्धट, तावशी, कुरवली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरा-नृसिंहपूर या गावांमधून नीरा नदी वाहते. इंदापूर तालुक्याबरोबरच माळशिरस तालुक्यातीलही अनेक शेतकऱ्यांना नीरेच्याच पाण्याचा आधार असतो. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळूउपशाचा परिणाम पात्रातील पाणीसाठ्यावर देखील होत आहे. तर ज्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही अशा ठिकाणच्या वाळूउपशामुळे भूजलपातळीही मोेठ्या प्रमाणात घटू लागली आहे. तसेच अगदी बंधाऱ्याच्या भिंतीलगतच वाळूउपसा होत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी बंधाऱ्यांनादेखील धोका पोहोचला आहे. उपसा केलेली वाळू वाहतूक टिपर व ट्रॅक्टरमधून बीकेबीएन रस्त्याने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था होत आहे. दररोज लाखो रुपयांची माया वाळूमाफियांना मिळत आहे. या वाळूमाफियांवर महसूल विभागाची ठोस अशी कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. नीरेच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांनी फळबागा, चारा पिकांची लागवड केली आहे. मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळामध्ये येथील शेतकरी भरडला गेला होता. जनावरांना चारा घालण्यासाठी शेतकऱ्यांना खिसे रिकामे करावे लागत होते. उन्हाळ्यामध्ये नदीला धरणातून पाणी सोडले जाईल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे सध्याच्या चारा पिकांवर पुढील उन्हाळी हंगाम परिसरातील शेतकऱ्यांना काढावा लागणार आहे. मात्र शासकीय कार्यालयातील ‘खाबूगिरी’मुळे दिवसाढवळ्या वाळूउपसा सुरू असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनातील घरभेद्यांमुळेच वाळूमाफिया चोरी करून उजळमाथ्याने फिरत आहेत, असा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तातडीने या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.