शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

पुष्करिणी घालतेय पर्यटकांना साद

By admin | Updated: November 30, 2015 01:52 IST

जुन्नरला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यापेक्षाही जुना इतिहास मंदिर वास्तुकलेचादेखील आहे. जुन्नरमध्ये असणाऱ्या प्राचीन मंदिरांजवळ काही विशिष्ट बांधकामे आढळतात

राजुरी : जुन्नरला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यापेक्षाही जुना इतिहास मंदिर वास्तुकलेचादेखील आहे. जुन्नरमध्ये असणाऱ्या प्राचीन मंदिरांजवळ काही विशिष्ट बांधकामे आढळतात. ते आपले लक्ष नेहमीच आकर्षित करत असतात. पुष्करिणी त्यापैकीच एक आहे. काही ठिकाणी किल्ल्यावर पुष्करिणी आहेत, तर काही ठिकाणी फक्त पुष्करिणी आहेत. मग नुसत्या पुष्करिणी अस्तिवात असणाऱ्या जागा काही वेगळाच इतिहास सांगू पाहत आहेत. बेल्हेजवळील प्राचीन पुष्करिणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत, अशी माहिती जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना हाडवळे म्हणाले, की प्राचीन काळापासून पुष्करिणी हा मंदिरांचा एक अविभाज्य घटक म्हणून निर्मिला गेला आहे. तत्कालीन बांधकामशैलीच्या वैशिष्ट्यानुसार पुष्करिणीचे विविध आकार आणि प्रकार आहेत. त्यांना भारतातील विविध भाषांमध्ये विविध नावे आहेत, जसे की पुष्करिणी, कल्याणी, कुंड, सरोवर तीर्थ, तालाब, पुखुरी आणि अजुन खूप काही. मुळात जगाच्या पाठीवर सर्वात पहिले मंदिर जरी सूर्याचे बनविले गेले असले तरी काळानुरूप होत गेलेल्या बदलात आर्थिक सुबत्ता आणि त्यातून झालेला कलेचा विकास हा मंदिर वास्तुकलेत प्रतिबिंबित झाला. हाडवळे म्हणाले, जुन्नर शहराजवळील पंचलिंग मंदिरातील पुष्करिणी आणि बेल्हे गावातील शेवटच्या घटका मोजत असलेली पुष्करिणी अशा मुख्यत्वे तीन पुष्करण्या आढळतात. जुन्नरच्या पुढे टाकळी ढोकेश्वरजवळ असणाऱ्या पळशीगावीसुद्धा १८व्या शतकातील विठ्ठल मंदिराजवळ एक सुस्थितीतील पुष्करिणी आढळते. चावंड किल्ल्यावरील पुष्करिणी आणि तिचे कोरीवकाम पाहता, त्याठिकाणी तत्कालीन भव्य असे मंदिर असावे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, असे सांगून हाडवळे यांनी या ऐतिहासिक स्थळाविषयी सांगितले की, चावंड किल्ल्याची जुन्नरमधील जागा, किल्ल्यावरील इतर बांधकामांचे अवशेष बघता इथे नक्कीच कोणीतरी तत्कालीन इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती वास्तव्याला होत्या यास दुजोरा मिळतो. पंचलिंग मंदिरातील पुष्करिणी आजही वापरात आहे. (वार्ताहर)मंदिराच्या बाहेर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पुष्करणी. पश्चिमेकडील मंदिरांमध्ये हा प्रकार खूप ठिकाणी आहे. पवित्र होऊन मंदिरात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली पाण्याची सुविधा किंवा पायऱ्यांची विहीर, पाषाणावर कोरीव कलाकुसर असलेली पाण्याची टाकी म्हणजेच पुष्करणी होय. मंदिराची भव्यता, मंदिराचे महत्त्व यावरूनही पुष्करणीच्या कोरीव कामात कमी अधिकता दिसून येते. हेमाडपंती बांधकामशैलीहेमाडपंत यांनी निर्मिलेल्या मंदिरांच्या शिल्पकलेला त्यांच्याच नावाने अर्थात हेमाडपंती बांधकामशैली म्हणून संबोधले जाऊ लागले आणि पुढे त्याचे नाव हेमाडपंती झाले. हेमाडपंत हा कुठला पंथ नसून ते हेमाडपंत या नावाचा अपभ्रंश आहे. मध्य भारतात मंदिरांच्या शिल्पकलेचा विकास होत असताना उत्तर आणि दक्षिण भारतीय शैली एकत्रित करून वेगळीच दख्खनची बांधकामशैली विकसित झाल्याचे दिसते. या दख्खन बांधकामशैलीत हेमाडपंत यांचा खूप महत्त्वाचा वाटा नंतरच्या काळात राहिला आहे. मंदिर बनविण्याची जागा निवडताना शक्यतो पाण्याच्या काठची निवडली जाते. साधारणपणे मंदिरे बनवत असताना मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप, त्यावरचे गोपुरम (द्रविडीयन पद्धती), गर्भगृह व त्यावरचे शिखर म्हणजे कळस असे विविध भाग पाडले जातात व त्यावर विशेष काम केले जाते.