शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरांसाठी मोफत लसीकरण मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST

पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या बांधकाम मजुरांच्या मोफत लसीकरण मोहिमेला बुधवारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार ...

पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या बांधकाम मजुरांच्या मोफत लसीकरण मोहिमेला बुधवारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. आज पहिल्या दिवशी या मोहिमेअंतर्गत अंदाजे ३ हजार ४०० बांधकाम मजुरांचे लसीकरण पार पडले. भविष्यात शहरातील तब्बल ३५ हजार बांधकाम मजुरांचे लसीकरण या अंतर्गत हाती घेण्यात येणार आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, मनीष जैन, सचिव अरविंद जैन, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, संचालक संतोष जैन, उपाध्यक्ष रमाकांत शर्मा, अपोलो क्लिनिकचे विभागीय व्यवसाय प्रमुख विकास अगरवाल, क्रेडाई पुणे मेट्रो-कामगार कल्याण समितीच्या समन्वयिका सपना राठी, समिती सदस्य मिलिंद तलाठी, पराग पाटील, लीना कुकरेजा, नवीन अगरवाल, क्रेडाई सदस्य अर्चना बडेरा, अनुप जमतानी व कमर्शियल एक्झिक्युटिव्ह संतोष ताकभाते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेडाई पुणे मेट्रोचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी यांनी केले.

बांधकाम मजुरांसाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या मोफत लसीकरण मोहिमेचे कौतुक करताना विक्रम कुमार म्हणाले की, शहराच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मजुरांचे लसीकरण होणे ही महत्त्वाची बाब आहे. क्रेडाईने हाती घेतलेल्या या मोहिमेला महानगरपालिका संपूर्णपणे पाठिंबा देईल. शिवाय या मोहिमेसाठी आवश्यक डॉक्टर, नर्स व लसींचा पुरवठा करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू.

रणजीत नाईकनवरे म्हणाले, “कोविड काळात मजुरांच्या आरोग्य तपासणीबरोबरच मजुरांची अधिकृत नोंदणी, त्यांच्यासाठी लेबर कँपमध्ये आवश्यक सोयी, लहान मुलांसाठी क्रेश या बाबींवर क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने लक्ष देण्यात आले. याबरोबरच त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी आम्ही ही मोफत लसीकरण मोहीम हाती घेत आहोत. लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर इतक्या संख्येने मजूर घेऊन जाणे शक्य नसल्याने सरकारने बांधकाम प्रकल्पांवर लसीकरणाचे नियोजन करावे, अशी आमची मागणी आहे. याबरोबरच केवळ मजुरांपर्यंतच न थांबता त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण करणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असल्याने महापालिकेने लस उपलब्ध करून देत आम्हाला सहकार्य करावे.”

लसीकरण मोहिमेला सुरुवात करताना मजूर लस घेणार नाहीत किंवा त्यांनी ती घ्यावी यासाठी जागृती करावी लागेल, असे आम्हाला वाटले होते. मात्र ९९ टक्के मजूर हे लसीकरण करून घेण्यासाठी सकारात्मक असल्याचे आमच्या लक्षात आले, ही एक आशादायी बाब आहे, असे सांगून अरविंद जैन म्हणाले, शक्य तितक्या मजुरांना दोन्ही डोस देत त्यांचे संपूर्ण लसीकरण करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोतच. यामध्ये अनेक कंपन्या सामाजिक दायित्व उपक्रमाअंतर्गत मदतीसाठी पुढे आल्या आहेत, मात्र तरीही योग्य प्रमाणात लस उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिकेने आम्हाला सहकार्य करावे.