शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

लातूरमधील रुग्णांसाठी खाकी वर्दीला फुटला पाझर..!

By admin | Updated: April 10, 2016 04:12 IST

मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा रुग्णालयांनाही बसत आहेत. रुग्णांची तहान भागविण्यासाठी ‘१९८९’च्या तुकडीमधील पोलीस निरीक्षक पुढे सरसावले असून, लातूरच्या शासकीय रुग्णालयाला

- लक्ष्मण मोरे,  पुणे

मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा रुग्णालयांनाही बसत आहेत. रुग्णांची तहान भागविण्यासाठी ‘१९८९’च्या तुकडीमधील पोलीस निरीक्षक पुढे सरसावले असून, लातूरच्या शासकीय रुग्णालयाला महिनाभर पाणी पुरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ‘प्रिय मित्रांनो, आपल्या राज्यात आणि विशेषत: लातूरमध्ये पाण्याचे फार हाल आहेत. पाण्यासाठी अक्षरश: डोकी फुटत आहेत. लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाण्याविना रुग्णांचे हाल होत आहेत. सर्वांचा प्रश्न आपण सोडवू शकत नसलो तरी या रुग्णांना औषधापेक्षा असलेली पाण्याची चिंता तर आपण दूर करू शकतो. ‘आपण खारीचा वाटा उचलू या.’ असा मेसेज पोलीस निरीक्षकांच्या १९८९ च्या तुकडीच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर २ एप्रिल रोजी पडला होता. नागपूरच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक संजय पांडे यांनी हा मेसेज टाकला होता. सोलापूरमध्ये कार्यरत असलेल्या निरीक्षक नाना कदम यांनी ही कल्पना उचलून धरली. या तुकडीच्या २०० अधिकाऱ्यांशी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. प्रत्येकाने दर महिन्याला एक हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासाठी लातूरमध्येच नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या खात्यावर सर्वांनी पैसे जमा करायचे ठरले. नांदेडचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनीही पुढाकार घेत रुग्णांना किती पाणी लागेल, त्यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज घेतला. पंढरपूरचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी ओळखीमधून मिनरल वॉटरच्या उत्पादकाशी संपर्क साधला. त्यांनी स्वस्तामध्ये पाणी देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे १५ एप्रिलपासून लातूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पिण्यासाठी ‘मिनरल वॉटर’ मिळणार आहे. पुण्यामध्ये नेमणुकीस असलेल्या निरीक्षक अनिल पाटील, श्रीकांत नवले, धनंजय धुमाळ, एम. एम. मुजावर, रघुनाथ फुगे, सुनील पवार, अरुण वायकर, संजय कुरुंदकर, संजय पाटील, कल्याण पवार, अनिल आडे, बाळासाहेब सुर्वे, संजयनिकम, बळवंत काशीद, विष्णू जगताप आणि भागवत, मिसाळ यांच्यासह राज्यामध्ये विविध ठिकाणी नेमणुकीस असलेल्या या तुकडीच्या अधिकाऱ्यांनीही या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर सहज ‘चॅटिंग’ करताना सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून चांगला सामाजिक उपक्रम राबवता येऊ शकतो, हेसुद्धा या अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळामुळे फारच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पोलीस अधिकारी असलो तरी समाजाचा एक घटक आहोत. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून समाजाचे देणे ‘पाणी’ देऊन फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. - अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणीविरोधी पथक, पुणे