शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

वैद्यकीयच्या ४१ जागांना अखेर हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 01:47 IST

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १५ टक्के जागा या केंद्र स्तरावर भरण्यात येतात. मात्र केंद्र स्तरावरील प्रवेशांच्या काही जागांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती

पुणे : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १५ टक्के जागा या केंद्र स्तरावर भरण्यात येतात. मात्र केंद्र स्तरावरील प्रवेशांच्या काही जागांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थागिती नुकतीच हटविण्यात आली असून, केंद्रीय कोट्यातील ४१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालये व ४ दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेशाचे काम केले जाते. यामध्ये ठराविक जागांना केंद्राच्या कोट्यातून प्रवेश दिला जातो. राज्य व केंद्र स्तरावरील सर्व जागा ३० सप्टेंबरपर्यंत भरणे क्रमप्राप्त होते. मात्र, विविध कारणांनी केंद्राच्या काही विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केल्याने यातील ४१ जागा बाकी होत्या. प्रवेशाची अंतिम मुदत संपल्याने या जागा भरण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने अखेर उठविली असून, ७ आॅक्टोबर रोजी हे ४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश अखेर करण्यात आले आहेत. ६ आॅक्टोबरला स्थगिती उठल्यानंतर एका दिवसात प्रवेश झाले पाहिजेत, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे सर्व ठिकाणचे ४१ प्रवेश या एका दिवसात करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. याबरोबरच दंतवैद्यकीय महाविद्यालयाचेही ५ प्रवेश शुक्रवारी एका दिवसात करण्यात आले. केंद्रस्तरावरील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नीटमधील गुणांच्या आधारे देण्यात येतात. त्यामुळे मागील २ दिवसांत राज्यातील शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयांत एकूण ४६ प्रवेश देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)राज्याच्या वैद्यकीयच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे तत्काळ द्यावी लागणार नसून प्रवेशावेळी सेल्फ अटेस्टेड कॉपी दिली तरी चालणार आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे देणे आवश्यक आहे, असेही वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे दोन दिवसांत वैद्यकीयचे ४१ प्रवेश व दंतवैद्यकीयचे ५ प्रवेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अतिशय सुकर झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत असून, वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाच्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळाला आहे. - डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, संचालकशुक्रवारी राज्यातील अभिमत विद्यापीठांतील वैद्यकीयचे प्रवेशही शासकीय नियंत्रणाखाली पार पडले. यामध्ये ८ अभिमत विद्यापीठांतील १० वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश होता. हे प्रवेशांचे कामही वैद्यकीय शिक्षण संचालनालयामातर्फे घेण्यात आले.