शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’ कारखान्याची विक्रीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

By admin | Updated: April 27, 2015 23:46 IST

थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमिनीची विक्रीप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमिनीची विक्रीप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. येणाऱ्या रकमेतून बँकेचे ३२ कोटी रुपये एवढ्या कर्जाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम कारखाना प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे पुणे शाखा व्यवस्थापक पी. एम. भुक्तर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कर्ज तसेच कथित भ्रष्टाचार यामुळे गेल्या चार हंगामात ‘यशवंत’ उसाचे गाळप करू शकला नाही. कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे, जमीन विक्री करून पुन्हा कारखाना सुरू करणे असे अनेक प्रयोग झाले. त्यानंतर आपल्या सुमारे ३२ कोटी कर्जाची वसुली करण्यासाठी राज्य बँकेने कारखान्यासह सर्व जमिनीचे गहाणखत असताना दि. २७ मार्च रोजी यशवंतच्या ११७ एकर जमिनीचा ताबा घेतला. जमिनीचे मूल्यांकन करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. प्राथमिक पाहणी करण्यासाठी आज राज्य बँकेचे पुणे शाखेचे व्यवस्थापक भुक्तर यांच्यासमवेत विभागीय अधिकारी प्रमोद देशमुख, मूल्यांकनकार गिरीश पवार, श्रीनिवासन आले होते. (वार्ताहर)४जमिनीचे मूल्यांकन झाल्यानंतर बँकेच्या प्रशासकीय मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर विक्रीची जाहिरात देण्यात येणार आहे. यास सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. ४त्यानंतर इतर प्रक्रियेसाठी एक महिना जाणार आहे. सध्या रेडी रेकनरप्रमाणे या परिसरातील जमिनीचा प्रतिएकरी दर सुमारे १ कोटी ४0 लाख रुपये आहे. ४या जमिनविक्रीमध्ये जो खरेदीदार राखीव किमतीपेक्षा जास्त किंमत देईल, त्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ४यशवंत आम्हीच सुरू करणार, अशी आश्वासने गेल्या चार वर्षांपासून ऐकून सुमारे 20 हजार सभासद व एक हजार कामगार कंटाळले आहेत. त्यामुळे आता त्यांचा राजकारणी नेतेमंडळींवर विश्वास राहिलेला नाही. ४यशवंत सुरू व्हावा व रोजीरोटीचा प्रश्न कायमचा मिटावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे या विक्रीप्रक्रियेत आता काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.