शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील भातशेती अंतिम टप्प्यात

By admin | Updated: November 7, 2016 01:19 IST

पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते.

डिंभे : पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. सध्या येथील भातशेती अंतिम टप्प्यात आली आहे.भातपिकाच्या यंदा उशिरा झालेल्या पेरण्या, त्यामुळे लागवडीसाठी झालेला उशीर. लागवडीनंतर अतिपावसामुळे सडू लागलेली भातशेती व त्यानंतर परतीच्या पावसाने भातउत्पादन क्षेत्रातून वेळेआधीच घेतलेला आखडता पाय, यामुळे यंदा भातकाढणीच्या हंगामाचे दिवस लांबत चालले आहेत. सध्या हळव्या जातीची काढणी चालू असली तरी गरव्या जातीची भातशेती अंतिम टप्प्यात एका पावसावाचून वाया गेली आहे. गरव्या जाती पावसाअभावी निसवल्याच नाहीत. यामुळे खाचरातील सुरगाड जमा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.बहुतांश भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसल्याने जून, जुलैदरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भात लागवडीची कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आॅक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो. दसऱ्यादरम्यान थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाही म्हणायला हळव्या जातीच्या भातपिकास फायदा झाला. मात्र गरव्या जाती या वेळी नुकत्याच जोर धरू लागल्या होत्या. परंतु यंदा भात हंगामाच्या सुरूवातीस पेरणीपासून पावसाने दिलेल्या हुलकावण्या व त्यामुळे भातरोपे पेरण्यास उशीर झाला. पेरणीनंतरही पुढची भातशेतीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाणारी नक्षत्रे कोरडी गेल्याने उगवून आलेली भातरोपे जळून गेली होती. उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी लागवडी उरकल्या खऱ्या परंतु कोवळे आवण व त्यानंतर पावसाने केलेली मुसळधार सुरूवात यामुळे भातखाचरे तुडुंब भरली. खाचरात लागड केलेले कोवळी भातरोपे सडून भातशेतीचे नुकसान होऊ लागले होते. त्यातच कशीबशी भातशेती वाचली. फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली येथे अद्यापही काही खाचरांतील भातपीक हिरवेजर्द असून त्यास लोंबही धरल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी भातपीक काढावयास सुरूवात केली आहे त्यांच्या हाती केवळ पळंज लागत असल्याने यंदा आंबेगाव तालुक्यात भात उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. या बाबत आहुपे खोऱ्यातील काही शेतकऱ्यांनी आंबेगाव तहसीलदारांना निवेदन दिले असून, पावसाअभावी वाया गेलेल्या भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.