शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले नारायणगडावरील अवशेष घेताहेत अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:31 IST

आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत.

- अशोक खरात खोडद : आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत. खोडदजवळील किल्ले नारायणगडावर असलेल्या प्राचीन वास्तूंचे अवशेष अखेरचा श्वास घेत आहेत. शासनाकडून या किल्ले नारायणगडावर असणाऱ्या प्राचीन वास्तूंच्या अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी मागणी दुर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे, वेळीच जर या किल्ल्यांचे जतन केले नाही, तर या किल्ल्यांकडे भविष्यात केवळ एक डोंगर म्हणूनच पाहिले जाईल.नारायणगडावरील राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचे दगडी खांब, शरभशिल्प, अंघोळीचे प्राचीन भांडे भग्न होत चालले आहेत. गणेशपट्टी आणि इतर अन्य प्राचीन दगडी वास्तू अखेरचा श्वास घेत आहेत. वेळीच या प्राचीन दगडी वस्तूंची डागडुजी केली नाही तर किल्ल्याची खरी ओळख असणाऱ्या या सर्व वास्तू काळाच्या ओघात लोप पावतील, अशी भीती निर्माण झाली आहे.किल्ले नारायणगडावर दुर्गप्रेमी-निसर्गमित्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संवर्धनाचे कार्य सुरू आहे. या गडावर गेल्यानंतर समोरच डाव्या बाजूला गाडलेल्या अवस्थेत पाण्याचे एक टाके होते. या ग्रुपच्या माध्यमातून या टाक्यातील माती बाहेर काढून टाके मोकळे केले आहे. सध्या या टाक्यात वर्षभर पुरेलएवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गडाचीवाडी, खोडद, हिवरे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व युवक या संवर्धन मोहिमेत सक्रिय आहेत.किल्ले नारायणगडाला आजवर अनेक अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. पेशवेकालीन म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पेशवेकालीन नसून पेशवेकाळाच्या आधीपासूनच हा किल्ला अस्तित्वात असल्याचे अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. या किल्ल्यावरील असणाºया पाण्याच्या टाक्या हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याच्या पुरावा आहे, असे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे.किल्ल्यावरील उत्तरेच्या बाजूला असलेला आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला चोरदिंडी दरवाजादेखील अखेरच्या घटका मोजत आहे,हा चोरदिंडी दरवाजा कोणत्याहीक्षणी कोसळला जाऊ शकतो. किल्ल्यावरील अनेक बुरुजव तट ठिकठिकाणी कोसळलेगेले आहेत.>प्रवेशद्वार कोसळले; शरभशिल्पही तुटलेकिल्ल्यावरील राजवाड्याचे दगडी प्रवेशद्वार काही वर्षांपूर्वी सुस्थितीत होते. अलीकडच्या काळात हे प्रवेशद्वार खाली कोसळले आहे. या प्रवेशद्वाराचा दगडी खांब तुटला आहे. प्रवेशद्वाराचे एका बाजूकडचे शरभशिल्प तुटले आहे.प्राचीन काळातील अंघोळीचे दगडी भांडेदेखील तुटले आहे. प्रवेशद्वारावर असलेली गणेशपट्टीदेखील खाली कोसळली असून ती नामशेष होण्याची भीती आहे.