शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनवाहिन्या मोजतायेत अखेरचा श्वास

By admin | Updated: February 2, 2017 03:39 IST

नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. प्रदूषणयुक्त औद्योगिक कारखान्यांमधील पाणी थेट नद्यांत सोडले जाते.

बारामती : नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. प्रदूषणयुक्त औद्योगिक कारखान्यांमधील पाणी थेट नद्यांत सोडले जाते. गावातील सांडपाणीदेखील नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर नद्यांच्या सीमारेषा झपाट्याने कमी होत आहेत. मानवनिर्मित प्रदूषणरूपी राक्षसाने नद्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. निसर्गाचा प्रकोप झाला तर मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे प्रदूषण आणि नद्यांवरील अतिक्रमण रोखण्याची गरज असल्याचे मत निसर्गतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी व्यक्त केले. जागतिक नदीप्रदूषण दिनाच्या निमित्ताने डॉ. गायकवाड म्हणाले, तीर्थक्षेत्राचे ठिकाण असलेल्या भीमाशंकर येथे भीमा नदीच्या उगमाचा विचार केल्यास नदीच्या उगमाशेजारीच प्लॅस्टिकचे ढीग दिसून येत आहे. भक्ती मार्गाने येणाऱ्या भाविकांकडूनदेखील नकळतपणे प्लॅस्टिकचा कचरा वाढतो. त्यासाठी जागृती केली जाते. परंतु, प्रतिबंध केला जात नसल्याने नियमांची पायमल्ली होते. नद्यांचे पावित्र जपले तर भूगर्भातील पाणी देखील चांगले मिळणार आहे. सध्या नद्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते. बहुतेक नद्यांमध्येच घरातील प्रदूषित कंपन्यांचे पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीचे अस्तित्व संपतेच. त्याचबरोबर मानवी जीवनही धोक्यात असल्याचे आढळून येत आहे. दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पातळीवर नद्या, ओढे, नाल्यांमध्येच प्रदूषित पाणी सोडले जाते. या संस्था पाणी प्रक्रिया करून सोडले जात आहे, असे सांगतात. परंतु, नद्या प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली जात नाही, अशी खंत डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केली. रासायनिक पाणी सोडल्यामुळे नद्यांच्या पात्रात गारवेलसारख्या वनस्पती वाढतात. इंदापूर तालुक्यातील भिगवणच्या उजनी जलाशय परिसरातील भीमा नदीची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यावर काहीच उपाययोजना होत नाही.नद्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा़़़बेसुमार होणारा वाळूउपसा रोखणेदेखील महत्त्वाचे आहे. वाळूउपशामुळे पाणी स्वच्छ होण्याची प्रक्रिया थांबते. वाळूमध्ये अनेक जिवाणूंच्या प्रक्रिया होवून पाणी स्वच्छ होते. त्यामुळे देशातील नद्या संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बेसुमार वाळूउपशावर मर्यादा आणणेदेखील गरजेचे आहे. भीमा नदीसह अन्य नद्यांमध्ये प्रदूषित कचरा टाकण्याचे प्रमाण कमी नाही. अगदी बारामती शहरातून जाणाऱ्या कऱ्हा नदीतच सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण वाढते. प्रदूषणमुक्त नदी करण्याची गरज आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय स्तरावरदेखील हा विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे. सध्या नदीकाठच्या लोकांना देखील स्वच्छ पाणी मिळत नाही. प्रदूषित पाण्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेला धोका निर्माण झाला आहे. नायट्रोजनचे प्रमाण वाढते. मिथेन, हायड्रोजन सल्फाईड असे घातक रसायन तयार होत असल्याने नद्या जीवनदायनी नव्हे तर मानवनिर्मित मृत्युदायिनी म्हणून दिसत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.