शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

मोठे रॅकेट उघड होणार

By admin | Updated: January 1, 2017 04:31 IST

सर्पविष तस्करीप्रकरणी सांगली येथील बायोलॉजिकल कंपनीच्या संचालकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

चाकण : सर्पविष तस्करीप्रकरणी सांगली येथील बायोलॉजिकल कंपनीच्या संचालकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींना ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी एक उत्तराखंड, एक उत्तर प्रदेशातील व साप पुरविणारे सांगलीतील तीन सर्पमित्रांची नावे आरोपींकडून निष्पन्न झाली असून, आरोपींची संख्या आठ झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी आयसेरा बायोलॉजिकल प्रा. लि. या विष घेणाऱ्या कंपनीचा संचालक डॉ. नंदकुमार कदम यास सांगली येथून अटक केली. त्यामुळे सर्पविषाची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होणार आहे. चाकण पोलीस, वनविभाग यांच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी रणजित पंढरीनाथ खारगे (वय ३७, रा. ए १/४०६, सारासिटी, खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) व धनाजी अभिमान बेळकुटे (वय ३०, मूळगाव वरकुटे मूर्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोन आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून ४० घोणस, ३१ कोब्रा नाग व विषाच्या तीन बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आले होते.आरोपींकडून सांगलीच्या एका कंपनीच्या संचालक डॉक्टरचे नाव निष्पन्न झाले. या डॉक्टरची स्वत:ची कंपनी असून, आरोपी खारगे याने कदमला ८ हजार रुपये प्रतिग्रॅमने २५ ग्रॅम विष विकून त्यास २ लाख रुपये मिळाले होते. या डॉक्टरने हे विष उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथील कंपन्यांना विकले होते. खारगे कोब्रा व घोणस पुरविणारे तीन सर्पमित्र सांगली येथील असून ते अद्याप फरार आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)