शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगसाठी मोजावी लागणार मोठी रक्कम

By admin | Updated: January 17, 2016 03:30 IST

नवीन सार्वजनिक वाहनतळ धोरणानुसार रस्त्यावरील पार्किंगसाठी मोठी रक्कम मोजण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे. पार्र्किं ग दर किती असावेत याचा अंतिम निर्णय मुख्य

पुणे : नवीन सार्वजनिक वाहनतळ धोरणानुसार रस्त्यावरील पार्किंगसाठी मोठी रक्कम मोजण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे. पार्र्किं ग दर किती असावेत याचा अंतिम निर्णय मुख्य सभेकडून घेतला जाणार आहे. मात्र सध्या आकारले जात असलेल्या पार्र्किं ग दराच्या चौपट रक्कम पार्किंग शुल्क म्हणून मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.वाहनतळाचे शुल्क हे वाहनतळाची मागणी आणि वाहनतळाची उपलब्ध जागा यानुसार निश्चित केले जाणार आहेत. सार्वजनिक वाहनतळ धोरणानुसार पार्किंगशुल्क ठरविताना ए, बी, सी व डी असे ४ भाग पाडले जाणार आहेत. ए क्षेत्रामध्ये (गावठाण परिसर) दुचाकींसाठी प्रत्येक तासाला २० रुपये, चारचाकीसाठी ७० रुपये, खासगी बससाठी ३५५ रुपये, मिनीबससाठी १४० रुपये, ट्रकसाठी १९५ रुपये तर टेम्पोसाठी ९० रुपये, असे साधारणपणे दर निश्चित करण्यात आले आहेत. बी क्षेत्रामध्ये दुचाकींसाठी प्रत्येक तासाला १५ रुपये, चारचाकीसाठी ५० रुपये, खासगी बससाठी २५० रुपये, मिनीबससाठी १०० रुपये, ट्रकसाठी १३५ रुपये तर टेम्पोसाठी ९० रुपये असणार आहे. सी क्षेत्रामध्ये (मोबिलिटी कॅरिडोअरपासून ५०० मीटरपर्यंत) दुचाकींसाठी प्रत्येक तासाला १० रुपये, चारचाकीसाठी ३५ रुपये, खासगी बससाठी १७५ रुपये, मिनीबससाठी ७० रुपये, ट्रकसाठी ९५ रुपये तर टेम्पोसाठी ४५ रुपये असे दर साधारणपणे निश्चित करण्यात आले आहेत. डी क्षेत्रामध्ये (निवासी क्षेत्र) दुचाकींसाठी प्रत्येक तासाला ५ रुपये, चारचाकीसाठी ३० रुपये, खासगी बससाठी १५० रुपये, मिनीबससाठी ६० रुपये, ट्रकसाठी ८५ रुपये तर टेम्पोसाठी ४० रुपये असे दर ठरविण्यात आले आहेत. धाडसी निर्णय घ्यावा लागणार दिल्लीमध्ये वाहनांचे वाढते प्रदूषण आणि वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर सम-विषय क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचपद्धतीने सार्वजनिक वाहतुकीचा कमी वापर करून जास्तीत जास्त वैयक्तिक वाहनांचा वापर होत असलेल्या पुण्यामध्ये पार्र्किं ग, पदपथाचा वापर याबाबत धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे. याला विरोध करण्यापूर्वी हा निर्णय घ्यावा लागण्यामागची कारणे समजुन घेण्याची आवश्यकता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.निवासी पार्किंग धोरणप्रत्येक प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सवलतीच्या दरात निवासी पार्र्किं ग परवाने दिले जाणार आहेत. हा परवाना त्या प्रभागापुरताच वैध असेल, इतर प्रभागांत वाहन लावल्यास त्या प्रभागानुसार दर आकारले जातील. रस्त्यावरील उपलब्ध पार्र्किं गच्या काही जागा त्या-त्या प्रभागातील रहिवाशांसाठी राखीव असणार आहेत. मात्र प्रत्येक रहिवाशाला पार्किंगसाठी जााग ठरवून दिली जाणार नाही. त्याला उपलब्ध जागेनुसार पार्किंग करावे लागेल.