शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

प्रत्येक शाळेत भाषा प्रयोगशाळा

By admin | Updated: September 5, 2014 23:59 IST

शिक्षण विभाग राबवित असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे.

पुणो : शिक्षण विभाग राबवित असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा करून देशातच नव्हे तर जगात स्पर्धा करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये आवश्यक पायाभुत सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण यंत्रणा निर्माण करण्याबरोबरच भाषा प्रयोगशाळा उभी केली जाईल. जागितक दर्जाचे मुख्याध्यापक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही राज्य सरकारचा मानस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
शिक्षक दिनानिमित्त राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा:या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण शुक्रवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे झाले. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, खासदार अॅड. वंदना चव्हाण, आमदार विनायक निम्हण, माजी आमदार मोहन जोशी,  शिक्षण सचिव अश्विनी भिडे, आयुक्त एस. चोक्कलिंगम, क्रीडा आयुक्त पंकज कुमार, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक सज्रेराव जाधव, उपसंचालक सुमन शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यभरातील 37 प्राथमिक शिक्षक, 38 माध्यमिक शिक्षक, आदिवासी विभागात काम करणारे 18 प्राथमिक शिक्षक, 2 विशेष शिक्षक, 1 अपंग विद्याथ्र्याच्या शाळेतील शिक्षक, 2 स्काऊट गाईड तसेच 8 शिक्षिकांना थोर समाज सुधारक कै. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिक पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. यावेळी सर्व 1क्6 पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटूंबीयही उपस्थित होते.
पुरस्कारामध्ये यावर्षी शिक्षकांना प्रथमच टॅबलेट, पीसी देण्यात आले. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, प्रत्येक मुलाला सहजगत्या शिक्षण मिळण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पायाभुत सुविधा वाढविण्यावरही भर दिला जात आहे. देशात राज्याची अर्थव्यवस्था प्रथम स्थानी असताना याबाबतीतही आपण पहिल्या क्रमांकावर यायला हवे. 
समाजाकडून शिक्षकांच्या खुप अपेक्षा असल्याचे सांगुन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, संस्कारी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. राज्य सरकार सर्वात जास्त निधी या विभागाला देत असले तरी तो आवश्यकच आहे. समाजाचे राहणीमान, मानसिकता, अपेक्षा बदलत चालली आहे. गुरू-शिष्य नात्यात अधिक मोकळेपणा आला आहे. कालानुरुप बदल व्हायलाच हवा. नवी पिढी अधिक कृतीशील व गतीशील व्हायला हवी.  फौजिया खान म्हणाल्या, राज्य व देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षणच एक जादुची कांडी आहे. समाजनिर्मिती हा आपला धर्म मानुन शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी पेलायला हवी. शाळा या व्यक्तीनिर्मितीचे कारखाने असून देशाला प्रामाणिक, चारित्र्यवान, सुसंस्कृत, कौशल्यवान व्यक्तींची गरज भागवितात.  जपानने शिक्षणातून मोठी प्रगती केली असून उन्नत, प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी आपणही असेच प्रयत्न करायला हवेत. अश्विनी भिडे यांनी शिक्षणाचे सार्वत्रीकरण करून गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग कटिबध्द असल्याचे सांगितले. 
 
च्ज्ञानाचा विस्फोट झालेला असताना इंग्रजी भाषा व गणिताच्या शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रत इंग्रजी संवादाची भाषा झाली आहे. आपणही इंग्रजी भाषा स्वीकारून पुढे जायला हवे. त्यादृष्टीने शिक्षण विभाग चांगले काम करीत आहे. उद्योग क्षेत्रच्या मदतीने विभागाने अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. 
च्समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका असलेल्या शिक्षकांबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन प्रत्येकाला सोबत नेत ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी ज्ञानदान करायला हवे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त पुण्यातील शिक्षक
1. बाळकृष्ण बाचल - मुख्याध्यापक, लोकनेते यशवंतराव चव्हाण, महानगरपालिका विद्यानिकेतन क्र. 6, नवी खडकी,येरवडा. 2. अनंता जाधव - सहायक शिक्षक, जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा, आतकरवाडी, ता. पुरंदर, जि.  पुणो 3. गोरखनाथ थोरात - सहायक शिक्षक, जयहिंद विद्यालय कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणो  4. दादासाहेब ओमासे - प्राचार्य, समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उरूळी देवाची, ता. हवेली, जि. पुणो 5. सुनिल पाटील - सहायक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ता. आंबेगाव, जि. पुणो 6. दिनेशकुमार पांडे - मुख्याध्यापक, एस. व्ही. युनियन हायस्कुल, सोमवार 
पेठ पुणो.