शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माणसांनुसार बदलते पोलिसांची भाषा

By admin | Updated: July 28, 2014 04:56 IST

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे.

पिंपरी : ‘पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे निरसन पोलिसांनी केलेच पाहिजे. त्यांना योग्य वागणूक दिलीच पाहिजे. अरेरावी करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही. अशा पोलिसांवर कठोर कारवाई करा,’ अशा शब्दांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. या आदेशामुळं काही फरक पडणार आहे का? मुळात पोलीस ठाण्यात येणाऱ्या कुणाला कशी वागणूक दिली जाते, याचा धांडोळा घेतला असता, पोलीस बहुरंगी भूमिका वठवताना दिसतात. प्रत्येक प्रवेशात त्यांचे डायलॉगही बदलतात. कसे ते पाहा...जोडगोळीचा ‘चोरीचा मामला’महाविद्यालयीन युवक-युवतींना आक्षेपार्ह वर्तन करताना पकडल्यास त्यांना बोलायलाही तोंड नसते. अशा वेळी मुलीला खुर्चीवर बसविले जाते, तर मुलाला मात्र खाली जमिनीवर बसविले जाते. थोडी दमदाटी केल्यास मुलगी घडाघडा बोलू लागते. मोबाइल नंबरही मुली खरे देतात. मुले मात्र चुकीचे मोबाइल नंबर पोलिसांना देतात. काही वेळा मित्रांचा नंबर वडिलांचा नंबर म्हणून देतात. कधीही न ऐकलेल्या शिव्या मुलांना पोलीस ठाण्यात ऐकाव्या लागतात. मुलींना मात्र सभ्यतेची वागणूक दिली जाते. आपले प्रकरण घरी कळेल, या दबावाखाली मुलगा-मुलगी दोघेही असतात. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावले जाते. समज देऊन सोडून दिले जाते. मात्र, दरम्यानच्या काळात विशेषत: मुलाला खूपच त्रास होतो. त्याला अशा ठिकाणी बसविले जाते, जिथून तो जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाला दिसू शकतो. पुढे अनेक दिवस त्याला नजर चुकवत फिरावे लागते.