शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडसाठी लवकरच भूसंपादन

By admin | Updated: April 2, 2015 05:51 IST

शहराच्या अंतर्गत भागातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी (एचसीएमटीआर) भूसंपादनाची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. खासगी क्षेत्रातील

पुणे : शहराच्या अंतर्गत भागातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी (एचसीएमटीआर) भूसंपादनाची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. खासगी क्षेत्रातील जागांचे भूसंपादन प्राधान्याने करण्यात येत असून, त्यासाठी विकास हस्तांतरणीय हक्क (टीडीआर) देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य शासनाशी संबंधित जागांचे भूसंपादन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी अंतर्गत रिंगरोड प्रस्तावित केला आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले नाही. महापालिकेने २१ टक्के जागेचे भूसंपादन केले आहे. त्यामध्ये शासनाच्या जागेचाही समावेश आहे. तरीही प्रकल्प पूर्ण होत नाही, याचा अर्थ रिंगरोड रद्द केला आहे का, असा प्रश्न आमदार अनंत गाडगीळ यांनी विधान परिषदेत बुधवारी उपस्थित केला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘नवीन भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने होणार आहे. एकूण ६४ हेक्टर क्षेत्र जागा आहे. त्यापैकी २५ हेक्टर जागा खासगी मालकी असून, त्यापैकी १५ हेक्टर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. उर्वरित ९.६८ हेक्टर क्षेत्राचे टप्प्या-टप्प्याने भूसंपादन करण्यात येणार आहे. शिवाय, रिंगरोडसाठी लागणारी २८.४७ हेक्टर जागा राज्य शासनाच्या विविध विभागांशी संबंधित असून, ही जागा ताब्यात देण्याचा प्रस्ताव महापालिकेने पाठविलेला आहे. त्यावर भूसंपादनाची तातडीने कार्यवाही होऊन रिंगरोडचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाचे सहकार्य राहील.’ (वार्ताहर)