शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अमेरिकेत राहणाऱ्या ज्येष्ठाची जमीन हडपली

By admin | Updated: May 2, 2015 05:22 IST

खोटी कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभ्या करून, खोटा दस्त करून अमरिकेत वास्तव्यास असलेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची जमीन हडपण्याचा

भोर : खोटी कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभ्या करून, खोटा दस्त करून अमरिकेत वास्तव्यास असलेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची जमीन हडपण्याचा प्रकार भोर तालुक्यातील कामथडी येथे उघडकीस आला आहे. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शदर विनायक ठकार असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोर पोलिसांकडून मिळालेली महिती अशी : शरद विनायक ठकार (वय ७४), त्यांची पत्नी कुंदा, मुलगा महेश व मुलगी मोनिका हे सध्या अमेरिकेत राहतात. त्यांची भोर तालुक्यातील कामथडी येथे वडिलोपार्जित मिळकत गट नं. ९४-१-ब ही ६४ आर जमीन आहे. ही जमीन १९४७पासून चंद्रकांत बाबूराव वाल्हेकर (रा. कामथडी) हे संरक्षित कूळ म्हणून असून ते कसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते अमेरिकेहून पुण्याला आल्यावर ती जमीन अरुणा चंद्रकांत वाल्हेकर यांना त्यांनी विकली. त्याचा दस्त करण्यासाठी भोरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आले असता निबंधकांनी सांगितले की, ही जमिनीचे ९-२-२०१५ रोजी खरेदी खत झाले आहे.या खरेदी खताचा दस्त काढला असता, शरद ठकार यांच्या कुटुंबीयांच्या नावाने बनावट व्यक्ती उभ्या करून अविनाश दिलीप चरवड, बजरंग दत्तात्रय चरवड (रा. वडगाव बु., ता. हवेली), बापू ज्ञानोबा पोळेकर (रा. कांजळे, ता. भोर), सगनगौडा धर्मगौडा नाईक (प्लॉट नं. ४३, सिद्धिविनायक अंगण, नऱ्हे, ता. हवेली) यांनी आपापसात संगनमत कट करून बनावट शरद विनायक ठकार, त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी उभे करून त्यांचे वारस आहेत, असे भासवून जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आह. भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)