शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

फुकटच्या मेंबरशिपसाठी जमिनीची खिरापत

By admin | Updated: November 6, 2015 03:14 IST

लाखो रुपये शुल्क असणाऱ्या पूना क्लबच्या मेंबरशिपसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन कवडीमोल भावाने भाडेतत्त्वावर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक

पुणे : लाखो रुपये शुल्क असणाऱ्या पूना क्लबच्या मेंबरशिपसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन कवडीमोल भावाने भाडेतत्त्वावर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. ब्रिटिशांनी १९२७ मध्ये कँप भागात पूना कल्बची सुरूवात केली. या प्रतिष्ठित क्लबची मेंबरशिपची सर्वसाधारण किंमत तीस लाख रुपये एवढी आहे. मात्र, राज्यातील ५३ बड्या अधिकाऱ्यांनी या क्लबची मेंबरशिप नाममात्र ५० हजार रुपयांत मिळविली. या मेंबरशिपसाठी येरवडा येथील शासनाची मोक्याची ११८ एकर जमीन प्रति वर्षाला प्रति एकर २०० रुपये एवढ्या नाममात्र दरात भाड्याने देण्यात आली. २०१२ पर्यंत ५३ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे सभासदत्व मिळवले होते, असा दावा चौधरी यांनी केला आहे.चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, येरवडा व बंडगार्ड रस्त्यावरील ११८ एकर जागेच्या भाडेपट्ट्यास राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांनी दि. ३० नोव्हेंबर २०११ च्या आदेशान्वये तब्बल तीस वर्षांसाठी मुदत वाढ दिली. ही मुदतवाढ अतिशय मातीमोल भाडे घेऊन देण्यात आली, असे आदेशावरून दिसते. या आदेशातील अट क्रमांक २ वरून सरळसरळ शासकीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार कागदोपत्री सिद्ध करणारी आहे. ‘जिल्हाधिकारी शिफारस करतील अशा किमान १५ अधिकाऱ्यांना प्रति वर्षी कायमस्वरूपी सदस्यत्व देणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार ज्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना यापूर्वी व येथून पुढे कायमस्वरूपी सभासदत्व दिले आहे अथवा देण्यात येणार आहे अशा सभासदांच्या मुलांना सदस्यत्व देण्याचे अधिकार क्लबच्या कार्यकारी व संचालक मंडळास राहतील,’ असे या अटीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हीच अट मान्य करावी म्हणून महसूल विभागाने १२ जुलै २०१३ रोजी आदेश काढून क्लबवर दबाव आणलेला दिसतो, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.हे संगनमत वर्षानुवर्षे चालले; मात्र मतभेद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी १४ जुलै व ११ आॅगस्ट २०१५ या तारखांना क्लबला तीन पत्रे लिहून अनियमितता आढळल्याचे कळविले आहे. क्लबने शासकीय अटी धाब्यावर बसवून अनेक अनियमितता केल्याने २३४ कोटी ७९ लाख ८१ हजार ८१८ एवढी रक्कम भरण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. इतक्या वर्षांनंतर जिल्हाधिकाऱ्यांना ही अनियमितता कशी दिसून आली, असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे. या आरोपांची चौकशी झाली व प्रत्यक्ष रक्कम भरली गेली का, याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून सीआयडी चौकशी करावी, क्लबचा नूतनीकरणाचा प्रस्ताव स्थगित करावा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)या अधिकाऱ्यांचा समावेशपूना क्लबच्या मेंबरमध्ये पोलीस, महसूल आणि शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. कश्यप, जयंत उमराणीकर, रणजितसिंह शर्मा, मीरा बोरवणकर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, उमेशचंद्र शरंजी, नितीन करीर, दिलीप बंड, याचबरोबर प्रभाकर देशमुख, उमाकांत दांगट, अनिल डीग्गीकर, सुहास दिवसे, माधवराव सांगळे, मधुकर कोकाटे यासारख्या आजी-माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.