शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

जमीन खरेदी-विक्रीतून होतात खून

By admin | Updated: July 3, 2015 00:34 IST

जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमी श्रमात ‘इस्टेट एजंट’ मंडळींना लाखो रुपये कमिशन मिळते. या आमिषापोटी अनेक जण या क्षेत्रात ‘एजंट’ म्हणून फिरत आहेत.

पिंपरी : जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमी श्रमात ‘इस्टेट एजंट’ मंडळींना लाखो रुपये कमिशन मिळते. या आमिषापोटी अनेक जण या क्षेत्रात ‘एजंट’ म्हणून फिरत आहेत. गल्लोगल्ली त्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भरपूर कमाई असल्याने ग्राहक मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. या चढाओढीतून हल्यापासून खूनापर्यंत घटना घडल्या आहेत.देशातील टॉप सिटींपैकी पुणे शहर एक आहे. शहराचे क्षेत्रफळ झपाट्याने विस्तारत आहे. शेजारच्या ग्रामीण आणि उपनगरात घर आणि जमिनीस पसंती दिली जात असून, त्याला मागणी वाढली आहे. साहजिकच पिंपरी-चिंचवड शहर, तसेच आजुबाजूला जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपरीगाव, वाकड, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, आकुर्डी, रावेत, किवळे, पुनावळे, चिखली, मोशी, आळंदी रस्ता आदी भागांत हे व्यवहार अधिक होत आहेत. जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यात लाखो रुपयांचा व्यवहार होत आहे. शहरात एक गुंठा जमिनीचा दर दहा लाखांच्या वर आहे. काही भागात हाच भाव दुप्पट ते तिप्पट आहे. त्यामुळे कमिशनपोटी एजंटला अधिक रक्कम मिळते. यातून या क्षेत्रात शेकडो तरुण उतरले आहेत. थोडाफार संपर्क आणि संभाषणकौशल्यावर हा बिगरभांडवली धंदा फोफावला आहे. महिलांचाही शिरकाव वाढत आहे. मोठी रोख रक्कम हातात पडत असल्याने गुंड प्रवृत्तीची मंडळीही यात उतरली आहेत. त्यांची मोठी साखळीच तयार झाली आहे. एजंटची संख्या वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे अशा एजंटच्या टोळ्याच शहरभर वावरत आहेत. अनेक ठिकाणी अशा एजंटनी कार्यालय थाटले आहे. व्यवहार फिसकटणे, तिसऱ्यांशी व्यवहार करणे, जागेचा दर्जा, कमिशन कमी देणे किंवा बुडविणे असे प्रकार घडत आहेत. परिणामी ग्राहक, मालक आणि एजंटमध्ये वाद उद्भवतात. या रोषातून त्यांच्यामध्ये हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रसंगी प्राणघातक हल्ले केले जात आहेत. सुपारी देऊन एखाद्याचा काटा काढला जात आहे. वादातील जागा बळकावणे, जागेवर ताबा मिळविणे, अतिक्रमण हटविणे आदीसाठी याच मंडळींचा पुढाकार असतो. जमिनीच्या वादातून शहरात खुनी हल्ले आणि खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. रावेत, निगडी, वाल्हेकरवाडी, हिंजवडी, पिंपळे गुरव, सांगवी, तळेगाव, मोशी आदी ठिकाणी खुनाचे प्रकार वर्षभरात झाले आहेत. पिंपळे गुरव येथील घटना तर ताजी आहे. (प्रतिनिधी)पैशांची चटक जीवघेणी एजंटला कमिशनपोटी लाखो रुपये झटक्यात मिळतात. व्यवहार सुरू झाल्यापासून त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याची आस धरून बसतात. व्यवहारात अनेक एजंट असल्याने प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला असतो. हातात मोठी रोख रक्कम पडते. त्यामुळे व्यवहारात कमिशनवरून खटके उडतच असतात. व्यवहार होऊनही अपेक्षित कमिशन न मिळाल्याने वादाची ठिणगी पडते. काही जण अधिक लालसेपोटी इतरांना कमी कमिशन देतात किंवा ते देणे टाळतात. त्यातून मारहाण केली जाते. कायमचा दूर करण्यासाठी हत्या होतात.