शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन

By admin | Updated: April 1, 2017 02:22 IST

मेहेंदळे गॅरेज परिसरातील झोपडीधारकांवर एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन कारवाई करण्यात आली. भल्या सकाळीच

कोथरूड : मेहेंदळे गॅरेज परिसरातील झोपडीधारकांवर एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन कारवाई करण्यात आली. भल्या सकाळीच मोठा पोलीस बंदोबस्त, चार जेसीबी, आठ मालवाहू ट्रक घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना येथील रहिवासी म्हणाले की, झोपडी पाडताना जी तत्परता अधिकारी दाखवत आहेत, तीच कर्तव्यदक्ष भूमिका बिल्डरने व्यवस्थित काम करावे म्हणून तुम्ही दाखवणार का?एसआरएने महापालिका व पोलिसांच्या सहकार्याने येथील जागा खाली करून घेतली. त्या वेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. एसआरएनुसार ५५ कुटुंबे पात्र आहेत. अपात्र कुटुंबांनी कोठे जायचे?, ज्यांनी बिल्डरबरोबर अ‍ॅग्रीमेंटला नकार दिला त्या लोकांची काय व्यवस्था करणार?, बिल्डरने ठरल्याप्रमाणे करार न पाळल्यास त्यावर कारवाई केल्याचे एकतरी उदाहरण तुमच्याकडे आहे का, असा प्रश्न येथील रहिवासी विचारत होते. अपात्र नागरिकांना वाऱ्यावर सोडू नये. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली. येथील रहिवासी पद्मा चव्हाण म्हणाल्या, की पौड रस्त्यावरील केळेवाडी येथील स. नं. ४४ मधील झोपडीधारक १९९६ पासून हक्काच्या घराची वाट पाहत आहेत. संक्रमण शिबिरात किती वर्ष ठेवावे, यासाठी कोणतीही कालमर्यादा नसल्याने बिल्डर गैरफायदा घेतात.एसआरएच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले, की राजेंद्रनगर येथे लाभार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. कायदेशीर कारवाई असून नागरिकांनी सहकार्य करावे.