रांजणगाव गणपती : येथील एमआयडीसीच्या तिस:या टप्प्याच्या विस्तारासाठी रांजणगाव गणपती, कारेगाव, बाभूळसर व करडे गावच्या शेतक:यांच्या शेतजमिनीवर मारलेले भूसंपादनाचे शेरे तत्काळ रद्द करण्याचे आदेश उद्योगमंत्री नारायण राणो यांनी पुण्याच्या जिल्हाधिका:यांना दिले.
या 4 गावांच्या परिसरातील शेतक:यांचा जिव्हाळय़ाचा व गेल्या 1क् ते 12 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने या ऐतिहासिक निर्णयाचे शेतक:यांनी फटाके वाजवून स्वागत केले. मुंबई येथे दि. 25 रोजी उद्योगमंत्री नारायण राणो यांच्या उपस्थितीतीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या वेळी शिरूर -हवेलीचे आमदार अशोक पवार, बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर, युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, बाभूळसरचे उपसरपंच दशरथ फंड, माजी सरपंच रवींद्र डाळिंबकर, कारेगावचे माजी सरपंच विश्वास कोहकडे, भाऊसाहेब पळसकर, मनोहर देशमुख, एमआयडीसीचे सीईओ भूषण गगराणी, युवराज पोमण, अण्णासाहेब चव्हाण, तसेच दीपक कोहकडे, विठ्ठल फंड, पोपटराव दसगुडे, नानासाहेब फंड यांच्यासह परिसरातील गावचे शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.
पुणो प्राधिकरणाची हद्द ही रांजणगावच्या सीमेलगत येत असून, भविष्यात शेतक:यांच्या या जमिनींना महत्त्व प्राप्त होणार असल्याचे पाचुंदकर यांनी या वेळी सांगितले. या प्रश्नासंदर्भात पुणो, मुंबई येथे ब:याच वेळा बैठका झाल्या होत्या.
राणो यांनी एमआयडीसीबाधीत वरील 4 गावांच्या शेतक:यांच्या शेतजमिनीवर मारलेले भूसंपादनाचे शेरे काढण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिल्याने शेतक:यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे पेढे वाटून व फटाके वाजवून स्वागत केले.
दरम्यान, फु टाणवाडी (पाबळ) येथील शेतक:यांनीही एसईङोडसाठी आरक्षित केलेल्या जमिनीवरील शेरे काढण्याचे निवेदन राणो यांना दिले असून, त्या संदर्भातही पाठपुरावा करू, असे अशोक पवार यांनी सांगितले.
4भूसंपादनाचे शेरे मारलेल्या रांजणगाव 144 हेकटर, बाभूळसर खुर्द
753 हेकटर, कारेगाव 24क् हेक्टर आणि करडे 384 हेकटर, अशा
एकूण 1521 हेकटर जमिनीच्या दोन्ही बाजूने डिंभे व चासकमानचे
पाणी येत असल्याने या सर्व जमिनी बारमाही बागायती होऊन पिके
निघू शकतात.
4शिवाय शिरूर तालुकयाने यापूर्वीही शासनाला पुर्नवसन,
एमआयडीसीसाठी भरपूर जमिनी दिलेल्या आहेत. आता मात्र
शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला असून, तिस:या टप्प्यासाठीच्या
विस्तारासाठी शेतजमिनीवर मारलेले भूसंपादनाचे शेरे काढावेत, अशी आग्रही मागणी आमदार पवार यांनी शेतक:यांच्या वतीने बैठकीत केली.