शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘लक्ष्मी’ने बोहल्यावरून काढला पळ

By admin | Updated: November 18, 2016 06:08 IST

वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले.

मंचर : वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले. आज लग्नाचा मुहूर्त ठरून लग्नाचे विधीही सुरू झाले. अखेर वधूने १00 नंबरवर संपर्क साधून हा प्रकार पोलिसांना कळविला. मात्र हे कळताच विधी उरकण्याची लगबग सुरू झाली. हार घालण्याची बळजबरी होताच ‘लक्ष्मी’ने बोहल्यावरून पळ काढला. ही घटना आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे घडली. याप्रकरणी मुलीचे आई, वडील, मध्यस्थ, मुलगा व त्याचे आई वडील अशा सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ऊर्फ नंदिनी सुरेश पाईकराव (वय १६ वर्षे १0 महिने, मूळ रा. बासंभा, हिंगोली. सध्या रा. रांजणी गावठाण) हिने स्वत: फिर्याद दिली आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मीच्या आई-वडिलांच्या ओळखीच्या कविता बाळासाहेब गायकवाड हिने घरी येऊन लक्ष्मीच्या लग्नाबाबत विचारपूस केली. नागापूर येथील लक्ष्मण नामदेव गायकवाड यांचा मुलगा पंकेश याच्याबरोबर लग्नाची मागणी घातली. लक्ष्मीच्या आईने आमची परिस्थिती नसून तिचे लग्न सध्या करणार नसल्याचे सांगितले. मात्र मध्यस्थी कविताने तुम्ही काही खर्च करू नका, मुलाकडील लग्नाचा सर्व खर्च करतील असे सांगितले. दसऱ्याच्या दिवशी ११ आॅक्टोबरला नागापूर येथे जाऊन लक्ष्मीचा गंधाचा कार्यक्रम झाला. या वेळी लक्ष्मी नाइलाजास्तव गप्प राहिली. घरी आल्यावर तिने माझे लग्नाचे वय पूर्ण झाले नसून, मी लग्नाला तयार नसल्याचे आईवडिलांना सांगितले. त्या वेळी तिच्या आईवडिलांनी, आपली परिस्थिती बेताची, गरिबीची आहे. समोरील लोक सर्व खर्च करणार आहेत, तेव्हा तू गप्प राहा असे सुनावले. लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी लक्ष्मीच्या आईवडिलांना मुलाकडून २0 हजार रुपये देण्यात आले. मुलाकडून लग्नपत्रिका छापण्यात येऊन १६ नोव्हेंबरला सायंकाळी ५.२१ हा मुहूर्त धरण्यात आला. यासंदर्भात लक्ष्मी ऊर्फ नंदिनी सुरेश पाईकराव हिने मंचर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी लक्ष्मीचे वडील सुरेश किसन पाईकराव, आई पार्वती सुरेश पाईकराव,मध्यस्थ कविता बाबासाहेब गायकवाड, सर्व रा. रांजणी, होणारा पती पंकेश लक्ष्मण गायकवाड, त्याचे वडील लक्ष्मण नामदेव गायकवाड, आई लीलाबाई लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला गेला. पुढील तपास फौजदार बी. एस. घाटगे करीत आहेत.