शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लाेकांमध्ये प्रतिकारशक्ती आहे, प्रत्येकाला लसीची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

पुणे : मागील दहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणुचा फैलाव झाल्याने ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असण्याची ...

पुणे : मागील दहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणुचा फैलाव झाल्याने ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक लोकांमध्ये पुर्वीचीच प्रतिकारशक्ती आहे. लहान मुलांना धोका कमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकालाच लस घ्यावी लागणार नाही. मात्र, भविष्यात रुग्ण किती आढळतात आणि सिरो सर्व्हेमध्ये किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर येते, यानुसार लसीकरणाचे नियोजन करावे लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

फायझर कंपनीच्या माजी उपाध्यक्षांनी कोरोनाची साथ ओसरत असल्याचे सांगून आता लशींची गरज नसल्याचा दावा केला आहे. तसेच ‘आयसीएमआर’नेही देशातील प्रत्येकाला लस लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याविषयी जनआरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके म्हणाले, लस कधी येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तोपर्यंत अनेक लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. काही अभ्यास व तज्ज्ञांच्या मतानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल. देशात सुरूवातीला आरोग्य कर्मचारी व त्यानंतर ज्येष्ठ नागरीक, अन्य आजार असलेला असा क्रम ठरलेला आहे. इतरांपर्यंत लस पोहचेपर्यंत आपण हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल केली असेल. त्यामुळे १०० टक्के लोकांना लस द्यावी लागणार नाही. लस किती लोकसंख्येला द्यायची हे त्यावेळी होणारे सिरो सर्व्हे व रुग्णसंख्येनुसार नियोजन करावे लागेल, असे फडके यांनी स्पष्ट केले.

-----------

लसीची गरज हा वादाचा मुद्दा

आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनीही लस येईपर्यंत अनेकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल, असे सांगितले. लसीची गरज हा वैज्ञानिकांमधील वादाचा मुद्दा आहे. सध्या किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती आहे, हे नक्की माहिती नाही. लशींच्या परिणामकारकतेबाबतही अद्याप संभ्रम आहे. पण सध्या विविध अभ्यासानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याची शक्यता आहे. जवळपास तेवढ्याच लोकांमध्ये पुर्वीची प्रतिकारशक्ती असू शकते. सुमारे १० टक्के लहान मुलांना फारसा धोका नाही. त्यामुळे प्रत्येकाला लस घ्यावी लागणार नाही, असे आवटे यांनीही नमुद केले.

-----------