पुणे : भाचीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमधून काढलेले सोन्याचे दागिने घेऊन पीएमपी बसने प्रवास करीत असताना चोरट्याने लांबवले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजश्री सुजीतकुमार पवार (२३, रा. कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे त्यांनी बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने काढले. ते दागिने घेऊन त्या आॅफीसमध्ये गेल्या. तेथून लहान मुलासह पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर पुतळा ते कोंढवा असा पीएमपीने प्रवास केला. घरी आल्यानंतर त्यांच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने, २ हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
तीन लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: May 30, 2014 04:54 IST