शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यामागील कलाकारांना ‘लाख’मोलाची मदत

By admin | Updated: June 29, 2017 03:38 IST

कलावंतांना अभिनयातून प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. कलाकृतीसाठी झटणारे पडद्यामागील कलाकार मात्र कायम दुर्लक्षित राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कलावंतांना अभिनयातून प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. कलाकृतीसाठी झटणारे पडद्यामागील कलाकार मात्र कायम दुर्लक्षित राहतात. त्यांच्या आरोग्याची समस्या उभी राहिल्यास आर्थिक चणचण जाणवते. ही समस्या दूर करण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशनने संकलित केलेला पावणेआठ लाख रुपयांचा निधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे बुधवारी सुपूर्द करण्यात आला. या निधीतून पडद्यामागच्या कलाकारांना, तंत्रज्ञांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा जिव्हाळा फाउंडेशनच्या विश्वस्त अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केली.बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित महोत्सवात अभिनेत्री अलका कुबल यांनी या निधीची घोषणा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कुबल म्हणाल्या, कलाकारांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी जिव्हाळा ट्रस्टची स्थापना केली होती. हे काम नीटपणे व्हावे, यासाठी हा निधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.