शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंटच्या जाचक कायद्यामुळे मतदानापासून वंचित

By admin | Updated: November 29, 2014 00:05 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूकविषयक कायदे स्वतंत्र आणि संदिग्ध असल्याने मतदारयादीत नोंद नावे नोंद करण्याची संधीच दिली गेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

पुणो : कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूकविषयक कायदे स्वतंत्र आणि संदिग्ध असल्याने मतदारयादीत नोंद नावे नोंद करण्याची संधीच दिली गेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.  नव्या मतदारांच्या अर्जाच्या सुनावणीच्या उपस्थित राहू शकले नसलेल्या 823 अर्जदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहेत. 
कॅन्टोन्मेंट बोर्डाने  आजच्या सुनावणीबाबतची माहिती बोर्ड मुख्यालयाच्या फलकावर काही दिवसांपूर्वी लावली होती.  नव्याने नावनोंदणी करणा:या अर्जदारांच्या अर्जावरच्या हरकतींची सुनावणी आज पहिल्या दिवशी झाली. वॉर्ड क्रमांक 1 ते 4 मधील 1,273 पैकी केवळ 45क् अर्जदार उपस्थित होते. त्यांच्यापैकी ज्यांनी योग्य पुरावे दिले असतील, त्यांचीच नावे यादीत समाविष्ट होणार असल्याचे बोर्डाच्या वरिष्ठ अधिका:यांनी स्पष्ट केले.
सुमारे 2,6क्क् नव्या मतदारांनी 21 तारखेर्पयत नोंदणीसाठी अर्ज दिले होते. या अर्जावरील सुनावणी आज बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सी. व्ही. अजय यांनी घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने 28 व 29 नोव्हेंबर रोजी हरकतींवरील सुनावणी आयोजिली असून, उद्या वॉर्ड क्रमांक 5 ते 8 मधील अर्जदारांची सुनावणी होणार आहे.
दरम्यान, 2क्-22 अर्जच गायब असल्याची तक्रार नागरिकांनी केली. बोर्डाच्या अधिका:यांनी मात्र अर्जामध्ये त्रुटी असल्याने अर्जदारांनी ते स्वत:च नेले आणि परत आणून दिले नाहीत. या अर्जाची नोंद मात्र वहय़ांमध्ये राहिली, असे स्पष्टीकरण दिले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक नियम 2क्क्7च्या कलम 16 नुसार बोर्डाच्या अध्यक्षाने किंवा त्याने नेमलेल्या प्रतिनिधीने हरकतींवरील सुनावणी घ्यावी, असे म्हटले आहे. अर्जदाराने यादीत नाव समाविष्ट करण्याबाबतचे पुरावे दाखवावेत, जोर्पयत अर्जदार उपस्थित राहणार नाही तोर्पयत सुनावणी होणार नाही. जे उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्याबाबत अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकतात. 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांसाठी यंत्रणोने घरोघर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा नाही. मतदारांना स्वत: नोंदणी करावी लागते. ही नावे यादीत सामील होणार की नाही, याचा पाठपुरावा स्वत:च करावा लागतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. (प्रतिनिधी)
 
त्रयस्थांना सुनावणीत थारा नाही
कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक नियम 2क्क्7च्या कलम 16 नुसार बोर्डाच्या अध्यक्षाने किंवा प्रतिनिधीने हरकतींवरील सुनावणी घ्यावी. अर्जदाराने यादीत नाव समाविष्ट करण्याबाबतचे पुरावे दाखवावेत. जोर्पयत अर्जदार उपस्थित राहणार नाही, तोर्पयत सुनावणी होणार नाही. जे उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्याबाबत अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकतात. या सुनावणीच्या वेळी अर्जदार यांच्याव्यतिरिक्त तिस:या घटकाला उपस्थितीची परवानगी नाही.
 
मतदार राजा की मतदाराला सजा ?
आज 1,273 अर्जदारांच्या हरकतींची सुनावणी होती. मात्र, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सी. व्ही. अजय सकाळी 1क् वाजता उपस्थित झाले. दुपारी साडेबारा वाजता बोर्ड मुख्यालय सोडून अन्य कामासाठी गेले आणि दुपारी 4 वाजता परत आले. यादरम्यान झालेली सुनावणी कायदेशीर आहे का, असा प्रश्न बोर्डाचे माजी अध्यक्ष मंजूर शेख यांनी केला आणि  मतदार राजाला ही सजा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.