पुणे : शहरामध्ये ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अडीच लाख प्लॅस्टिक बकेटचे वाटप करण्यात येणार आहे. त्याकरिता ५८ रुपये प्रति बकेट दराने खरेदी करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात या बकेट ३८ रुपयांना असल्याची माहिती उजेडात आली आहे. प्रत्येक बकेटमागे २० रुपये जादा मोजावे लागणार असल्याने पालिकेचे ४८ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा जिरविला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेच्या वतीने बकेट उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर स्थायी समितीकडून बकेट खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीने २ लाख ४२ हजार प्लॅस्टिक बकेट खरेदी करण्यासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या बकेटची विक्री होऊ नये म्हणून प्रत्येक बकेटवर पुणे मनपा असा उल्लेख करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर कमी दराने बकेट उपलब्ध होऊन पालिकेचा फायदा होत असेल, तर ते स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिले जाईल, तसेच त्यांना फेरनिविदा काढण्यास सांगण्यात येईल, असे ओमप्रकाश बकोरिया यांनी स्पष्ट केले आहे.४अहमदाबाद येथील ‘साई प्लॅस्टिक’ ही कंपनी ३८ रूपयांना प्लॅस्टिक बकेट देण्यास तयार असताना त्या बकेटची ५८ रूपयांनी खरेदी करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
्रकचरा बकेट खरेदीमध्ये पालिकेचे ४८ लाखांचे नुकसान
By admin | Updated: February 5, 2015 00:24 IST