शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लालेलाल टोमॅटो एक रुपया किलो

By admin | Updated: January 4, 2017 05:16 IST

३० किलो टोमॅटोचे कॅरेट अवघ्या २५ ते ३० रुपयांना टोमॅटो ज्यूससाठी उत्तर प्रदेशमधील टोमॅटो खरेदी करणाऱ्या भय्यांना पुरंदर तालुक्यातील शेतकरी विकत आहेत.

गराडे : ३० किलो टोमॅटोचे कॅरेट अवघ्या २५ ते ३० रुपयांना टोमॅटो ज्यूससाठी उत्तर प्रदेशमधील टोमॅटो खरेदी करणाऱ्या भय्यांना पुरंदर तालुक्यातील शेतकरी विकत आहेत. म्हणजे १ किलो टोमॅटो अवघ्या १ रुपया किमतीने विकला जातोय. मार्केटला टोमॅटो पाठवायचा म्हटले तर २५ रुपये भाडे द्यावे लागते. तोडणी, उत्पादन खर्चही निघत नाही. यंदा टोमॅटो पिकांच्या घसरलेल्या बाजारभावामुळे पुरंदर तालुक्यातील टोमॅटो शेतीव्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. लालेलाल झालेले टोमॅटोचे फड शेतकऱ्यांनी तोड्याविना तसेच सोडून दिले आहेत. काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या फडात गुरे सोडून दिली आहेत.पुरंदर तालुक्यात टोमॅटोची पिके चांगली आली आहेत. टोमॅटो पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यामुळे टोमॅटो पिकाचे प्रचंड उत्पादन झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ढासळलेले शेतमालाचे बाजारभाव अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नोटाबंदीचा थेट फटका टोमॅटो उत्पादकांनाही बसला आहे. आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची मोठी बाजारपेठ असलेने टोमॅटोची चांगली विक्री होऊन नफा मिळतो. टोमॅटोच्या पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो. जास्त पावसामुळे टोमॅटो खराब होतात. परंतु यंदा पुरंदर तालुक्यात खूपच कमी पाऊस पडला. त्यामुळे टोमॅटोचे फड चांगले येऊन टोमॅटो खराब झाले नाहीत. विक्रमी उत्पादन होऊन जास्त आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव घसरले तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे टोमॅटो पिकाचे बाजारभाव कोसळलेले आहेत. याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.टोमॅटो उत्पादक शेतकरी भाऊसाहेब शेंडकर व मनोज शेंडकर म्हणाले, दरवर्षी टोमॅटोचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो. परंतु यंदा मात्र टोमॅटोची पिके खूप चांगली येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघला नाही. सगळा तोटाच झाला आहे. आम्ही ३० किलो टोमॅटोचे कॅरेट २५ ते ३० रुपयाला भय्यांना विकत आहाते. २० गुंठ्यात टोमॅटोचा फड चांगल्यारीतीने आणण्यासाठी ४५ हजार रुपये खर्च झाला. आतापर्यंत टोमॅटो ५५०० रुपये हातात पडले आहेत. आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच तऱ्हा आहे. खूपच वंगाळ दिवस शेतकऱ्यांवर आले आहेत. (वार्ताहर)