शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूड, एरंडवणा, औध महागडे

By admin | Updated: April 2, 2016 03:40 IST

राज्यात बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घट झाली. परंतु, पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र वाढ

पुणे : राज्यात बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घट झाली. परंतु, पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र वाढ झाली नसली, तरी कोणतीही घट झालेली नाही. यामुळेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात सर्वाधिक सोलापूर सोडून पुणे जिल्ह्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी ९.३७ टक्के वाढ केली आहे. यामध्ये पुणे ग्रामीण भागात तब्बल ११.७० टक्के प्रभावक्षेत्र (झपाट्याने विकसित होणारा भाग) ११ टक्के, नगरपालिका क्षेत्र ११.५० टक्के, पुणे शहर ६ टक्के, पिंपरी-चिंचवड ६.६७ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.शहराच्या विविध भागांत फ्लॅट्सचे दर गगनाला भिडले असल्याने लोक ग्रामीण भागाकडे शहरापासून थोडे दूर फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करतात. पण आता ग्रामीण भागातील रेडीरेकनरमध्ये सरासरी ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना येथे देखील घरखरेदी करणे शक्य होणार नाही. घोरपडी परिसरात सुचविण्यात आलेले दर संपूर्ण शहरात सर्वाधिक आहेत, तर एरंडवणा आणि शिवाजीनगर, कोथरूड आणि औंध या भागांनी क्रमांक पटकविला आहे. यामध्ये घोरपडी परिसरासाठी १३ हजार ३६९, एरंडवणा १२ हजार ४८०, शिवाजीनगर ११ हजार ३३२, कोथरूड १० हजार ६५७ आणि औंध १० हजार ७१ प्रति चौरस फूट दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरात सर्वांत कमी ३ हजार ५०० चौरस फूट दर येवलेवाडी परिसरात आहे. गत वर्षीच्या तुलनेत या दरांमध्ये सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.शहरात फ्लॅटस्चे दर गगनाला भिडले असल्यामुळे लोक ग्रामीण भागाकडे घर घेण्याचा विचार करतात. परंतु आता ग्रामीण भागातील रेडी रेकनरमध्ये सरासरी ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना येथे देखील घर खरेदी करणे शक्य होणार नाही. मोकळ्या जागांमध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसरात सर्वाधिक दर सुचविण्यात आले आहेत. सदाशिव पेठ दर प्रतिचौरस फूटसाठी ८ हजार ७७ रुपये आणि नारायण पेठेत ७ हजार २४९ दर सुचविण्यात आले. शहरात सर्वांत कमी दर ३ हजार ५०० चौरस फूट दर येवलेवाडी परिसरात आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने गेल्या एक-दोन वर्षांतील फ्लॅट्स व अन्य मिळकतीचे खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेऊन रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यात येतात. रेडी रेकनरचे दर निश्चित करण्यासाठी ५६ विभाग तयार करण्यात आले असून, त्या विभागातील मोकळ्या जागा आणि फ्लॅट्स यांचे दर सुचविण्यात आले आहेत. प्रस्तावित दर विभागकमाल दरघोरपडी१३३६९ एरंडवणा१२४८१ शिवाजीनगर११३३२कोथरूड१०६५७ औैंध१००७१ सदाशिव पेठ९९९८ पर्वती९९२७ गुलटेकडी९९७४ येरवडा९७३५पुणे कॅन्टोमेन्ट८८२९ हिंगणे बु.८५७० नारायण पेठ८४६७ शनिवार पेठ८२८३पिंपरी सौदागर७७९९वाकड७११२चिंचवड७१६३