शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव खुर्द येथे मुलास पेटविले!

By admin | Updated: January 5, 2015 00:33 IST

कोरेगाव खुर्द (खेड) येथे १३ वर्षाच्या मुलास रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी अंगावर रॉकेल टाकून पेटविले.

चाकण : कोरेगाव खुर्द (खेड) येथे १३ वर्षाच्या मुलास रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी अंगावर रॉकेल टाकून पेटविले. सदर मुलगा ९८ टक्के भाजल्याने ससून येथे उपचार चालू असताना मयत झाल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( ता. ४ ) रात्री दोन वाजता कोरेगाव खुर्द येथे घरापासून १०० मीटर अंतरावरील डोंगराजवळ घडली. आकाश संदीप महाळुंगकर असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून, तो सातवी इयत्तेत शिकत होता. आकाशने दिलेल्या फिर्यादी जबाबावरून तो आज रात्री दोन वाजता घरातून डोंगराजवळ शौचाला गेला होता. त्या वेळी २५ ते ३० वयाच्या दोन अज्ञात व्यक्तींनी तुला जाळून टाकतो, असे म्हणून त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याचे सांगितले. त्यानंतर आकाश आरडाओरडा करीत घरी पळत गेला. त्यात तो ९८ टक्के भाजला. चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यास ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. हवेली पोलिसांनी आकाशचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करून चाकण पोलिसांना कळविले. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज सायंकाळी ६ वाजता आकाश मयत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा काहीतरी घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत असून, घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर अधिक माहिती उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)