शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कोंढव्यात काँग्रेसच्या रईस सुंडके यांची सरशी

By admin | Updated: November 3, 2015 03:36 IST

कोंढवा येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रईस सुंडके यांनी १ हजार ४६७ मतांनी विजय मिळविला़ सुंडके यांना ५ हजार १३४ मते मिळाली तर शिवसेनेचे

हडपसर : कोंढवा येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रईस सुंडके यांनी १ हजार ४६७ मतांनी विजय मिळविला़ सुंडके यांना ५ हजार १३४ मते मिळाली तर शिवसेनेचे सोमनाथ हारपुडे यांना ३ हजार ६६७ मते मिळाली़ या प्रभागात शिवसेनेच्या गेल्या २० वर्षांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे़ कोंढवा पोटनिवडणुकीत प्रथमपासूनच काँग्रेस आणि शिवसेना अशी लढत होती़ प्रचारात सर्वांनीच जोर लावला होता़ रविवारी झालेल्या मतदानाला नागरिकांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळाल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती़ पण, काँग्रेसच्या सुंडके यांनी सहज विजय नोंदविला़ वानवडीतील महादजी शिंदे शाळेत सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली़ तेव्हा पहिल्या फेरीत शिवसेनेने आघाडी घेतली होती़ त्यांची ही आघाडी दुसऱ्या फेरीतही कायम होती़ मात्र, तिसऱ्या फेरीपासून काँग्रेसने आघाडी घेऊन विजयाची मुहूर्तमेढ रोवली. रईस सुंडके यांना ५१३४ मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ हारपुडे यांना ३६६७ मते मिळाली. मनसेचे उमेदवार अमोल शिरस यांना ३११५, तर भाजपाचे उमेदवार सतपाल पारगे यांना २६११, एमआयएमचे उमेदवार अझर मणियार यांना १५८४, अपक्ष महम्मद खान (१७), राज फय्याज मुस्ताक (३४) मते मिळाली. तर २०१ जणांनी ‘नोटा’चा (यापैकी एकही नाही) वापर केला. कोंढवा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी १२ वाजता स्पष्ट झाला. या विजयामुळे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.आमदारांच्या मतदारसंघात दुसरा पराभवभाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी या निवडणुकीत खूप लक्ष घातले होते़ प्रचारासाठी त्यांनी कोंढव्यात फेरी काढल्या़ तरीही भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर गेला़ विधानसभा निवडणुकीनंतर टिळेकर यांच्या मतदारसंघात भाजपचा हा दुसरा पराभव ठरला़ यापूर्वी महंमदवाडी येथील पोटनिवडणुकीतही भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता़ या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एमआयएम पुणे शहरात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती़ मुस्लिमबहुल असलेल्या या परिसरात एमआयएमच्या उमेदवाराला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष होते़ अझर मणियार यांना केवळ १ हजार ५८४ मतांवर समाधान मानावे लागले़ ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले़शिवसेनेला धक्काशिवसेनेचे भरत चौधरी यांचे सदस्यत्व जातपडताळणीत रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक लागली होती़ महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वेगवेगळ्या कारणांनी कमी झाली होती. या पोटनिवडणुकीत शिवसेनेला आपले संख्याबळ पुन्हा वाढविण्याची संधी मिळाली. मात्र शिवसेनेला गड राखून ठेवता आला नाही. गेली २० वर्षे सत्ता असणाऱ्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धक्का लागला आहे़महापालिकेतील पक्षीय बलाबलपोटनिवडणुकीनंतर महापालिकेतील पक्षीय बलाबलराष्ट्रवादी काँग्रेस - ५४काँग्रेस - २९मनसे - २८भाजप - २६शिवसेना - १२रिपाइं - ०२एकाचे नगरसेवक पद रद्दएकूण - १५२