हडपसर : पुण्यातील कोंढवा येथील पोटनिवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. येथे दिवसभरात केवळ ३८ टक्के मतदान झाले. संपूर्ण परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ घटना सोडल्या, तर मतदान शांततेत पार पडले.सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदान केंद्रावर अपवाद वगळता गर्दी नव्हती़ दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह कमी होता. चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त पाहायला मिळला. युवकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह जास्त होता. मतदार यादीतील नावे गायब लुल्लानगर भागातील मतदारांना निराश व्हावे लागले. येथील यादी क्रमांक २७२/७३/७४/७५ या याद्याच गायब असल्याचे निदर्शनास आले. या वेळी मतदारांनी पक्षनेते व निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. एकूण ४२ हजार मतदार होते. त्यापैकी १६ हजार २७५ मतदान झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या नेत्यांनी कोंढवा परिसराच्या आसपास हजेरी लावलेली पाहायला मिळत होती. याचबरोबर आजी-माजी आमदारांचेही या मतदानाकडे बारकाईने लक्ष होते. मतमोजणी सोमवारी होणार आहे़
कोंढवा पोटनिवडणुकीत ३८ टक्के मतदान
By admin | Updated: November 2, 2015 01:11 IST