शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे प्रश्न जाणून घ्या, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:58 IST

लोकांना आज अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकांमध्ये जावे. त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले.

पुणे : लोकांना आज अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकांमध्ये जावे. त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले.पुणे शहरातील मनसेचे प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे शाखा अध्यक्ष आदी निवडक पदाधिकाऱ्यांचा मेळावा भोसलेनगर येथील क्लब हाऊसवर पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, कुठल्या बाबी टाळाव्यात याबाबत त्यांनी संवाद साधला. संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे त्यांनी सांगितले.राज ठाकरे यांनी सांगितले, ‘‘सोशल मीडिया सध्या खूपच प्रभावी माध्यम बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला सोशल मीडियामुळेच मोठे यश मिळाले. मात्र, आज हाच सोशल मीडिया मोदी यांच्या विरोधात गेला आहे. सोशल मीडियावर तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे त्याचा मोठा प्रभाव निवडणुकांवर पडतो आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सोशल मीडियावर तुम्ही काय पोस्ट टाकता, हे सगळे पाहत असतात, त्यामुळे त्या जबाबदारीने टाका’आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने शहरातील पक्ष संघटन मजबूत करण्यावर मनसेकडून भर दिला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेली भाजपाची लाट ओसरत चालली आहे, त्यामुळे निर्माण होणारी स्पेस मनसेने घ्यावी, यासाठी कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढविण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून केला जात आहे.खालपर्यंतच्या पदाधिकाºयांशी संवादकेवळ शहर पातळीवरील मोजक्या पदाधिकाºयांपर्यंत मर्यादित न राहता प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष या अगदी खालपर्यंतच्या पदाधिकाºयांशी संवाद साधण्यावर ते भर देत आहेत. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे