शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकाने युवकाला लुबाडले

By admin | Updated: October 12, 2016 02:15 IST

पायी जाणाऱ्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या तिघांपैकी दोघांना तातडीने अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले़ घोरपडी येथील रेल्वे गेट

पुणे : पायी जाणाऱ्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या तिघांपैकी दोघांना तातडीने अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले़ घोरपडी येथील रेल्वे गेट बंद असल्याने त्यांचा शोध घेत असलेल्या पेट्रोलिंगवरील पथकाचा हाती ते लागले़ अक्षय विजय पवार (वय १९, रा़ पांडवनगर, पाषाण) आणि ऋषीकेश सुनिल बागुल (वय १९, रा़ कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ ही घटना मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्या पार्किंगजवळ मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला़ याप्रकरणी मुकेशसिंग भोरा (वय १९, रा़ मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे़ मुकेशसिंग हे आपले काम संपून पायी घरी जात होते़ त्यावेळी मोटारसायकलवरुन तिघे जण तेथे आले़ त्यांनी चाकूला धाक दाखवून त्यांच्याकडील १ हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पसार झाले़ त्यानंतर मुकेशसिंग हे काही अंतरावर आल्यावर त्यांना पोलिसांची पेट्रोलिंग गाडी दिसली़ त्यांनी झालेला प्रकार त्यांना सांगितला़ पोलिसांनी त्यांनाबरोबर घेऊन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली़ ते घोरपडी येथील रेल्वे गेटजवळ आले़ पोलिसांची गाडी पाहून तिघांपैकी पप्पु थोरात हा पळून गेला़ दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़ याबाबत सहायक पोलीस निरीक्षक बी़ एस़ ढवळे यांनी सांगितले की, पप्पू थोरात याचा काल वाढदिवस असल्याने त्याने या दोघांना बोलविले होते़ त्यानंतर येरवडा येथून मुंढव्याला आले़ त्यावेळी त्यांनी या युवकाला लुबाडले़ पप्पु थोरात याचा शोध घेत असून न्यायालयाने दोघांना १३ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ (प्रतिनिधी)