शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शाळांत किचनशेड बनली ‘गोडाऊन’

By admin | Updated: February 2, 2016 01:16 IST

विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, या हेतूने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी किचन शेड उभारण्यात आली खऱ्या

पुणे : विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, या हेतूने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी किचन शेड उभारण्यात आली खऱ्या; मात्र अनेक ठिकाणी पोषण आहार न शिजवता गोडाऊनसारखा शेडचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आलेली आहे. त्याच वेळी काही तालुक्यांमध्ये मात्र त्याचा चांगला वापर होत असल्याचेही दिसून आले आहे.जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी तसेच ग्रामीण भागातील मुलांना सकस आहार मिळावा, या हेतून राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. सुरवातीला बचत गटांतील महिलांच्या साह्याने शाळेतच आहार शिजवला जात होता. सुरुवातीला ही योजना प्रभावीपणे चालली. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती; मात्र तिच्या दर्जाबाबत तसेच धान्य निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे प्रसंगी बचत गटाच्या महिलांना पदरचे पैसे खर्च करूनही विद्यार्थ्यांना भोजन द्यावे लागत होते.ही योजना प्रशासकीय उदासीनतेमुळे रखडली. बचत गटांची बिले वेळेवर निघत नसल्याने अनेक ठिकाणी पोषण आहार शिजणे बंद झाले. यातून मार्ग काढण्यासाठी शासनातर्फे शाळेतच किचनशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शाळांना निधीही देण्यात आला. शाळेच्या आवारातच हे किचनशेड उभारण्यात आले. या किचनशेडसाठी गॅसजोड तसेच सिलिंडरही देण्यात आले. मात्र, या किचनशेडचा वापर काही शाळांनी चक्क गोडाऊनसारखा केल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळले. शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने हा आहार शिजवणेच बंद केले आहे. किचनशेड जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तेथे शालेय पोषण आहार शिजविण्याबाबतचे नियोजनही आवश्यक आहे. पोषण आहार शिजविण्यासाठी किचन शेड असले तरीही अनेक शाळांतून किचनशेडमध्ये पोषण आहार शिजवलाच जात नाही....अन्यथा मुख्याध्यापकांवर कारवाईजिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली. त्यात काही शाळांमध्ये किचनशेडचा वापर हा गोडाऊनसारखा केला जात असल्याचे आढळले. यामुळे काही ठिकाणी ही शेड वापराअभावी पडून आहे. मुलांना शाळेतच आहार मिळावा, या हेतूने या किचनशेडची उभारणी करण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक घेऊन हा आहार किचनशेडमध्येच शिजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शाळा या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.- शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद