शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकट दिनानिमित्त कीर्तन, भजन

By admin | Updated: March 2, 2016 00:52 IST

श्री गजाननमहाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, लिंक रस्ता, काळभोरनगर, जुनी सांगवी या भागातील

निगडी : श्री गजाननमहाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, लिंक रस्ता, काळभोरनगर, जुनी सांगवी या भागातील गजाननमहाराज मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी यानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन झाले. माघ वद्य सप्तमीला गजाननमहाराज प्रकट दिन साजरा होतो. मंगळवारी पहाटेपासूनच शहरातील गजाननमहाराजांचे मंदिरांत दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७ मधील मंदिरात सोमवारी सकाळी अभिषेक केला. यानंतर श्री गजानन विजयग्रंथ मंडळाच्या वतीने सामुदायिक पारायण करण्यात आले. वैदेही महिला भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते. सायंकाळी पाचला महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी सकाळी काकडारतीनंतर सहाला महाअभिषेक झाला. सकाळी नऊला ‘झंकार महाराष्ट्राचा’ हा महाराष्ट्रातील लोककलांचा आविष्कार संजीवनी महिला शाहिरी पथकाने सादर केला. यानंतर अध्यायवाचन करून महाराजांची आरती झाली. यानंतर ‘स्वर नाद रंग’ या ताल-वाद्यवादन आणि गायनाच्या मैफलीचा लोकांनी आनंद लुटला. चिंचवडगावातील देऊळमळ्यात अभिषेक, पारायण, गणेशयाग, भजन, भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. याशिवाय महाप्रसाद, धूपारती, कीर्तन याचेही नियोजन करण्यात आले होते. लिंक रस्त्यावरील गजाननमहाराज मंदिरातही सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी दिसून येत होती. यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच निगडी, प्राधिकरणातील अनेक ठिकाणी प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यांना नागरिकांनी प्रतिसाद दिला. (वार्ताहर)४खडकी : येथील डेपोलाइन मित्र मंडळ व नवनाथ महिला भजनी मंडळाच्या कीर्तन सप्ताहाचा समारोप दिलीपमहाराज पायगुडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोमवारी झाली. या वेळी भाविकांनी गर्दी केली होती. मंडळाच्या गणेश मंदिर प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात पायगुडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सप्ताहामध्ये बाळासाहेब वाळुंज, साहिल शेख, शालकराम खंदारे, सुभाष बडथे, नारायण गोसावी, गजानन जंगले यांचे कीर्तन झाले. अशोक मोरे, विष्णू जाधव यांनी मृदंगावर, साळुंखे यांनी हार्मोनियमवर आणि लक्ष्मीकांत घोडके यांनी वीण्यावर साथसंगत केली. नवनाथ, गौरी, ओंकार, विठ्ठल-रुक्मिणी, अंजली व ज्ञानाई महिला मंडळांने भजन सादर केले. कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती.