शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कायनेटिक कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक

By admin | Updated: August 12, 2016 00:59 IST

चिंचवड येथील कायनेटिक टायझीन इलेक्ट्रिक कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीचे व्यवस्थापक एम. के. माधवन यांनी दिलेल्या

पिंपरी : चिंचवड येथील कायनेटिक टायझीन इलेक्ट्रिक कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीचे व्यवस्थापक एम. के. माधवन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे कायनेटिक टायझीन इलेक्ट्रिक कंपनीचे कार्यालय असून, एम. के. माधवन हे कंपनीचे व्यवस्थापक आहेत. ही कंपनी तैवान या कंपनीकडून स्टाटर मोटार खरेदी करीत असते. खरेदी केल्यानंतर कंपनीला त्यांच्या खात्यावर पैसे जमा करत असते. दरम्यान, मे महिन्यात आरोपीने कायनेटिक कंपनीला तैवान कंपनीचा ईमेल हॅक करून एक ईमेल पाठविला. त्या ईमेलमध्ये आरोपीने तैवान कंपनीने पैशांचा भरणा करणारी नेहमीची बँक बदलली असून, मेट्रो बँक लंडन या बँकेच्या माध्यमातून व्यवहार करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार कायनेटिक कंपनीने १९ मे २०१६ ते २० जुलै या कालावधीत मेट्रो बँकेच्या खात्यावर एक कोटी, १८ लाख रुपये जमा केले. मात्र, पैसे भरूनही तैवान कंपनीकडून स्टाटर मोटारचा पुरवठा न झाल्याने, कायनेटिक कंपनीने तैवान कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा कंपनीने व्यवहारासाठी नेहमीचीच बँक असल्याचे सांगितले. त्यानंतर कायनेटिक कंपनीला फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर कंपनीच्या व्यवस्थापकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)