शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

जनवाडीतील तरूणीला बेदम मारहाणीचा प्रकार

By admin | Updated: March 12, 2015 06:18 IST

गोखले नगर येथील जनवाडीमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीला ५ ते ६ मुलांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना

पुणे : गोखले नगर येथील जनवाडीमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीला ५ ते ६ मुलांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याविरूध्द जनवाडी पोलीस चौकीमध्ये ती तरूणी तक्रार द्यायला गेली असता पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती तरूणी गरवारे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.मारहाण झालेल्या मुलीच्या वडीलांचा बेकरीचा व्यवसाय आहे. बेकरीच्या दुकानात ती मुलगी वडिलांना मदत करते. बुधवारी सायंकाळी ती तरूणी दुकानात एकटी असताना ५ ते ६ जण तिच्या दुकानामध्ये आले. त्यांनी तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरूणीच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. पोलिसांकडे याविरोधात ती मुलगी तक्रार द्यायला गेली असता तिला पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य केले नाही. रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली. याबाबत जनवाडी पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. जनवाडी पोलीस चौकीमध्ये रात्री फोन उचलला जात नव्हता, अनेकवेळा फोन करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. रात्री उशिरा विनोद गायकवाड या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(प्रतिनिधी)