शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिसंग्रहालयाच्या कामास खोडा

By admin | Updated: May 11, 2016 00:32 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. शनिवारी दहा विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, संभाजीनगर येथे होणाऱ्या प्राणिसंग्रहालय नूतनीकरणाच्या कामास भाजपाने आक्षेप घेतल्याने चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कामास खोडा घातला गेला आहे. उद्घाटनाचे काय होणार, याबाबत चर्चा आहे.दिनेश वाघमारे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनास शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. समाविष्ट गावांतील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचे काम सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या हट्टासाठी केले जात आहे. त्यावर कोट्यवधींची उधळण केली जात आहे, असा आक्षेप भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आयुक्तांनी शहर अभियंता यांना या कामांची चौकशी करावी. तोपर्यंत वर्कआॅर्डर थांबवावी, असे तोंडी आदेश दिले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या शनिवारी होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन समारंभाची पत्रिका तयार केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते सकाळी पावणेअकराला प्रभाग क्रमांक नऊ संभाजीनगरमधील प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ होणार आहे. संभाजीनगरच्या कामांची वर्कआॅर्डर आयुक्तांनी थांबविली असताना दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रशासनाने याच कामाचे भूमिपूजनही आयोजित केले आहे. त्यामुळे हे उद्घाटन होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी आणि प्रशासनात या मुद्द्यावरून जुंपली आहे. (प्रतिनिधी)या प्रकरणी आयुक्तांनी चौकशी करावी. ते माहिती घेऊन निर्णय देतील. एकदाही नगरसेवक न झालेल्यांनी उपद्व्याप करू नयेत. नागरिक सुज्ञ आहेत. मानसिक संतुलन बिघडल्याने आरोप केले जात आहेत. आम्ही चुकीचे काम करणार नाही.- मंगला कदम, सत्तारूढ पक्षनेत्या