शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

किवळेत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: September 8, 2016 01:20 IST

शहरातील सेक्स रॅकेटचे लोन आता ग्रामीण भागात पोहचले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने किवळेतील साई लॉजवर

देहूरोड : शहरातील सेक्स रॅकेटचे लोन आता ग्रामीण भागात पोहचले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने किवळेतील साई लॉजवर सोमवारी छापा टाकून बेकायदा वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या वेळी १४ मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी फिर्याद दिली आहे. साई लॉजचे मालक प्रशांत शेट्टी यांच्यासह आरिफ अल्लाउद्दीन नासर ऊर्फ जॉन (रा. डांगे चौक, थेरगाव), विनोद अशोक भगत (रा. किवळे), संदीप रामअवतार पासवान (रा. किवळे) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळेतील मुकाई चौकाजवळ साई लॉज येथे प्रशांत शेट्टी व त्यांचे इतर साथीदार हे मुलींना वेश्या व्यवसायास प्रोत्साहित करून त्यावर स्वत:ची उपजीविका करीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलिसांच्या साह्याने कारवाई करण्यात आली.पोलिसांनी एका बनावट ग्राहकास लॉजवर पाठवले. तेथे वेश्याव्यवसायासाठी मुली मिळत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकला. विविध खोल्यांत १४ सज्ञान मुली आढळून आल्या. त्यांची मुक्तता केली आहे. त्या वेळी लॉजवर उपस्थित असलेले अरिफ अल्लाउद्दीन नासर ऊर्फ जॉन (रा. डांगे चौक, थेरगाव) , विनोद अशोक भगत (रा. किवळे) संदीप रामअवतार पासवान (रा. किवळे ) यांना ताब्यात घेतले आहे. मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून लॉजवर कुंटणखाना चालवून उपजीविका करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या सूचनेनुसार निरीक्षक राम जाधव, देहूरोडचे निरीक्षक अरुण मोरे, सहायक निरीक्षक श्रीमती एस. एस. पाटील (महिला कक्ष), सहायक निरीक्षक सतीश होडगर, उपनिरीक्षक खाडे, हवालदार आर. डी. मिरघे, शंकर जम, सुनील जावळे, दत्तात्रय जगताप, रौफ इनामदार, सुनील बांदल, चंद्रकांत वाघ, ज्योती कांबळे, सुनीता कोरपड, डी. डी. डमरे यांच्या पथकाने कारवाई केली. (वार्ताहर)