शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

मुलींचे अपहरण; एकीवर बलात्कार

By admin | Updated: July 2, 2017 02:16 IST

शिरापूर (ता. दौंड) येथील आदिवासी समाजाच्या अडीच आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण करून त्यातील एका पाच वर्षांच्या मुलीवर

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथील आदिवासी समाजाच्या अडीच आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण करून त्यातील एका पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली असून, अज्ञात इसमाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरापूर येथे उपजीविकेसाठी आलेल्या कातकरी समाजातील या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलात्कार झाल्याची तक्रार दौंड पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार मांजरे यांनी दिली. पीडित मुलींच्या आईचा गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी अज्ञात जनावरांच्या दंशाने मृत्यू झाला आहे. त्यांचे वडील कामनिमित्त बाहेर गेलेले असताना, त्यांच्या गावकडील एक अज्ञात इसम वडापाव खाण्यासाठी या दोघींना सिद्धटेक (ता. कर्जत) येथे घेऊन गेला असल्याचे मुलींच्या आजीने वडिलांना सांगितले. तेव्हा त्या मुली तेथे आढळून आल्या नाहीत. मुलींच्या वडिलांनी अधिक शोधाशोध केली असता, त्यांना या मुली भांबोरा (ता. कर्जत) परिसरातील पवारवस्ती येथे उसाच्या शेताशेजारी आढळून आल्या, त्यानंतर त्या मुलींना रुग्णवाहिकेतून दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले त्यानंतर अधिक उपचारसाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर गुन्ह्याची फिर्याद अज्ञात इसमाविरुद्ध पीडित मुलींच्या वडिलांनी दौंड पोलीस स्टेशन येथे दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार करीत आहेत.